Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Tyanche Natak By Vijay Kenkare

Tyanche Natak By Vijay Kenkare

Regular price Rs. 139.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 139.00
Sale Sold out
Condition
... वेस्ट एन्ड व्हाया ब्रॉडवे
"विजय केंकरे ह्यांचा लोकसत्तेमधे त्यांनी चालवलेला स्तंभ आठवडाभर आतुरतेने वाट पहावी असा होता. पाश्चात्य रंगभूमीवर त्यांनी पाहिलेल्या अनेक नाटकांबद्दल त्यांनी ज्या साक्षेपाने, मर्मग्राही रसिकतेने, आस्वादक चिकित्सेने लिहिले आहे त्याला मराठीत तरी तोड नाही. जन्मभर नाटकांचा निदिध्यास घेतलेल्या व त्यातच जीवन व्यतीत केलेल्या विजयच्या लेखनाला अधिकारयुक्त वजन आहे; तरी ते आग्रही नाही की स्वमतांबद्दल अकारण आक्रमक नाही."
महेश एलकुंचवार
-------------
प्रहार २२ सप्टेंबर २०१३
पाश्चात्य नाटकांची रनिंग कॉमेंट्री
ज्येष्ठ रंगकर्मी विजय केंकरे यांनी लिहिलेलं त्यांची नाटकं : वेस्ट एन्ड व्हाया ब्रॉडवे हे पुस्तक येत्या शनिवारी अक्षर प्रकाशनतर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकाला केंकरे यांनी लंडनच्या ब्रॉडवेवर पाहिलेल्या नाटकांची आणि त्यांच्या लेखनशैलीची खासियत सांगणारी प्रस्तावना नाटयलेखक राजीव नाईक यांनी लिहिली आहे. तिचा प्रस्तावनेचा हा संपादित भाग..
मराठीमध्ये प्रवासातल्या नाटयाची वर्णनं करणारी खूप पुस्तकं लिहिली गेली, पण प्रवासात बघितलेल्या नाटकांचं वर्णन करणारी अशी पुस्तकं जवळजवळ नाहीतच. एखादं नाटक आपल्याला बघायचं असेल, तर ज्यानं ते बघितलं आहे त्याला आपण म्हणतो, ए, काही जास्त सांगू नकोस त्याबद्दल. पण एखादं नाटक पाहायचं राहूनच गेलं तर ज्यानं ते बघितलं होतं त्याला आपण म्हणतो, अरे, काही सांग की त्याबद्दल. जी नाटकं आपण बहुतेक कधी बघूच शकणार नाही, त्या नाटकांबद्दल या पुस्तकात सांगितलं आहे. हे एक या पुस्तकाचं अप्रूप आहे.
सिनेमे काय किंवा वेगवेगळे खेळ काय, आता घरबसल्या पाहता येतात. नाटकाचं तसं नाही. ते जिथे सादर होतं तिथे तुम्ही त्या वेळी असलात, तरच नाटक बघता येतं. या लिखाणाचं एक मोल असं की, ते असा काहीसा बदली अनुभव पुरवतं. बदलीच, पण काहीच नसण्यापेक्षा बरंच की. मी काही हे प्रयोग पाहिलेले नाहीत, पण मला ब-यापैकी दिसू शकले हे नाटयप्रयोग. याचं कारण विजय केंकरे एकाच वेळी गुंतून आणि तटस्थपणे, तपशीलवार आणि नेमकं, प्रामाणिक पण प्रतिक्रिया देणं न टाळणारं, असं लिहितात. हे कसं झालं, तर टीव्ही नसताना कॉमेंट्री कशी सामना न बघताही आपल्या डोळ्यासमोर क्रिकेटची मॅच घरबसल्या उभी करायची. विजय नाटकं बघत लहानाचा मोठा झाला, तसाच कॉमेंट्री ऐकतही झाला, त्याचा हा परिणाम असावा तसं काहीसं. उदाहरण म्हणून लायन किंग नीट वाचा. आहे की नाही अगदी बॉल टू बॉल रनिंग कॉमेंट्री? एक्स्पर्ट कॉमेंट्स फार नाहीत हेही फार छान वाटतं. केंकरेंचं सांगणं चित्रवाण आहे.
पण केंकरेंच्या या पुस्तकात फक्त सांगितलेलं नाही. म्हणजे हा परिचय आहे म्हटल्यावर वर्णन येणारच, पण यात विश्लेषणही आहे. त्यामुळे केंकरे कुठलं नाटक बघतात आणि त्यात काय काय आहे हे जसं कळतं, तसं केंकरे नाटक कसं बघतात, तेही कळतं. (आपण नाटक कसं बघावं ते काही केंकरे सांगत नाहीत!) केंकरेंचा भर समजून घेण्यावर समजावून देण्यापेक्षा नक्कीच अधिक आहे. केंकरे कधी कधी आपली बाजू मांडतात, पण कशाचा निर्वाळा देत नाहीत. हे पुस्तक न्यायाधीशाचं कामही करत नाही.
केंकरे पुष्कळ नेमकेपणाने लिहितात, पण बोजड लिहीत नाहीत हा मोठ्ठाच गुण म्हटला पाहिजे. म्हणूनच तर वाचनीयता त्यांच्या लिखाणात पुरेपूर आहे. तरीही केंकरेंना थोडी काटकसर करता आली असती. त्यानं त्यांचा नेमकेपणा वाढला असता. केंकरे बोलावं तसं लिहितात. जे एरवी लेखक नसतात त्यांनी लिहिलं की, हा गुण येतो वाटतं. केंकरे मेंदूला कमी लेखत नाहीत, पण हृदयापासून लिहितात. त्यांच्या गप्पा मारण्याच्या रीतीमुळे हे लिखाण खुमासदार होतं. पण ही शैली आठवडयाला येणा-या वृत्तपत्रीय सदरात ठीक, तीच शैली पुस्तकात कशी वाटेल? बरीच वाटेल असं वाटतं. हल्ली इतकं पुस्तकातल्यासारखं बोलतात लोक की, हे बोलल्यासारखं लिहिलेलं पुस्तक उलट चांगलंच वाटेल. सदरातल्या लेखांचा पुस्तकातून संग्रह होत असताना काही बदल व्हावेत का? काही वाढवावं का? काही कापावं का? या पुस्तकात काही गोष्टी वाढवल्या आहेत.
(उदाहरणार्थ, त्यांच्या नाटकांबरोबर ती कुठे होतात याचा परिचय, अर्थात, वेस्ट एन्ड व ब्रॉडवे म्हणजे नेमकं काय, वगरे.) हा भाग उपयोगाचा आहे आणि रोचकही आहे. काही कापलं असतं तर उदाहरणार्थ, आपला नाटकाचा अनुभव अगदी पेपरातली जाहिरात बघितल्यापासून सुरू होतो हे खरं; पण प्रत्येक वेळी छबिलदासमधल्या नाटकांची आठवण काढताना, गल्लीत मिळणा-या बटाटावडय.अंचा उल्लेख हवाच का? आणि तो कुणाबरोबर खाल्ला, याचाही? पण एक आहे आपल्याला छबिलदासच्या गल्लीतले बटाटावडे जेवढे माहीत असतात, तेवढे काही लंडनच्या -हॅरॉलडमधला हाय-टी माहीत नसतो. ठाऊक नसलेल्या गोष्टी ऐकायला थोडं बरं वाटतंच.
त्यांच्या लिखाणाचे विशेष दोन एक तर विषय आणि दुसरा म्हणजे लेखक. या विषयावर कुणीही लिहिलं असतं तरी किंचित मजा आलीच असती. कहाण्या ऐकायला मजा येणारच. असं झालं, इथे गेलो, हे पाहिलं, ते असं होतं.. यात रस वाटणं स्वाभाविकच नव्हे काय? पण जे होतं ते कसं वाटलं, तसं का वाटलं, कशामुळे तसं वाटलं हे उलगडायला जाण हवी. लेखकामुळे हे पुस्तक खुलतं, फक्त विषयामुळे नाही. असं लिहू शकणा-या लेखकाने आणखी लिहायला हवं. नाटकांवरच. त्यांच्या नाटकांवरही केंकरेंनी अधिक लिहावंच, पण आता वेस्ट एन्ड ब्रॉडवेचे झगझगीत प्रकाशझोत ज्यांच्यावर पडले नाहीत अशा ऑफ ब्रॉडवे आणि फ्रिंजवरच्या त्यांच्या नाटकांवर आणि फक्त त्यांच्या नाही आमच्याही नाटकांवर लिहावं. विजय माझा मित्र खरा, माझ्या अनेक नाटकांचा दिग्दर्शकही. पण तो माझ्या धाकटया भावासारखाही आहे. त्यामुळे मी त्याचं कौतुक तर करणारच. पण जाहीरपणे हे लिहिण्याचं कारण मात्र माझं विजयशी असलेलं नातं नाही, तर केंकरे यांचं हे लिखाणच आहे. मी अनेकदा नाटय माध्यमाबद्दल विचार करू लागलो आणि मला मजाही आली.
अर्थात, नुसतीच मजा येत नाही हे पुस्तक वाचताना. कलावंतांनी स्वत:च्या कलेबद्दल लिहिलं की, एक वेगळी जाण प्रकट होते. मराठी नाटककारांनी पुष्कळ लिहिलं आहे नाटकांवर. एरवी नाटकाशी रंगभर तर सोडाच, कणभरही संबंध नसलेलेच करतात नाटयसमीक्षा! नट, दिग्दर्शक, रंगज्ञ यांनी त्या मानानं कमी लिहिलं आहे नाटकांवर. उपलब्ध समीक्षेबद्दल नुसतंच नकारात्मक बोलण्यापेक्षा असं काही प्रत्यक्ष लिहिण्याचा प्रयत्न करणं स्वागत करण्याजोगंच नव्हे का
View full details