Inspire Bookspace
Swad Aani Ruchitil Vidnyan by Dr. Ratikant Hendre
Swad Aani Ruchitil Vidnyan by Dr. Ratikant Hendre
Regular price
Rs. 81.00
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 81.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
जवळजवळ सर्वच वनस्पतींना त्यांचा म्हणून काही वेगळा स्वाद असतो; रुची असते. एरव्ही व्यवहारात आपण ह्या गोष्टींकडे लक्ष देत नसतो; परंतु ह्या स्वाद व रुचीत विज्ञान किती दडले आहे हे ह्या पुस्तकातील विविध लेखांतून स्पष्ट झाले आहे. खाद्यपदार्थ अधिक रुचीपूर्ण व स्वादिष्ट व्हावेत यासाठी काही मसाल्याचे वा इतर पदार्थ आपण वापरत असतो. अशा विविध वीस वनस्पतिजन्य पदार्थांची सांगोपांग व वैज्ञानिक भूमिकेतून ह्या लेखांत चर्चा केली आहे. प्रस्तुत पुस्तकाचे लेखक डॉ. रतिकांत हेंद्रे हे पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (NCL) संशोधक म्हणून चौतीस वर्षें कार्यरत होते. त्यांचे अनेक शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शास्त्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत. मनोवेधक आणि अभ्यासपूर्ण अशी माहिती असलेले हे पुस्तक वाचकांची विज्ञानविषयक दृष्टी प्रगल्भ करणारे आहे.
