Inspire Bookspace
Shikshanvata Chokhaltana by Bhimrao Bhoyar
Shikshanvata Chokhaltana by Bhimrao Bhoyar
Couldn't load pickup availability
शिक्षण हा व्यवसाय होण्याच्या आजच्या काळात भीमराव भोयर यांनी मात्र व्रतस्थ वृत्तीने ह्या क्षेत्रात काम केले आहे . शिक्षण आणि समाज यांकडे ते अतिशय डोळस दृष्टीने पाहतात. प्रयोगशील , चिंतनशील आणि क्रियाशील शिक्षकाचे हे प्रांजळ निरीक्षण अंतर्मुख करणारे आहे .
बालक , पालक , शिक्षक आणि शासन यांच्या परस्परसंबंधांवर ते प्रकाश टाकतात . त्यातल्या न्यूनतेवर ते बोट ठेवतात . त्यातील प्रत्येक घटकाचा त्यांनी खोलवर विचार केला आहे . भोयर ही मांडणी कधी सांस्कृतिक , कधी शैक्षणिक , कधी मानसिक तर कधी सामाजिक अंगाने करतात .
एका सर्जनशील शिक्षकाचे हे पुस्तक शिक्षकांना , पालकांना आणि संपूर्ण समाजालाच दिशादर्शक आहे . ह्या शिक्षणाच्या वाटा बालकांचे भवितव्य उज्ज्वल करणाऱ्या आणि नवनिर्मितीकडे नेणाऱ्या आहेत .
भारताच्या कोवळ्या पिढीचे भवितव्य ज्यांना उत्तम घडवावे असे वाटते , त्या सर्वांनी हे पुस्तक मन : पूर्वक वाचावे . ह्यातील प्रत्येक लेखातून भोयर यांची शिक्षणविषयक तळमळ व्यक्त होते .
अभय बंग आणि वसंत आबाजी डहाके यांच्यासारख्या मान्यवरांच्या प्रस्तावना भोयर यांच्या कामाची मौलिकता स्पष्ट करणाऱ्या आहेत.
