Skip to product information
1 of 16

Inspire Bookspace

Sampurna Mahabharat by Bhalba Kelkar (Khand 1 te 8)

Sampurna Mahabharat by Bhalba Kelkar (Khand 1 te 8)

Regular price Rs. 7,200.00
Regular price Rs. 8,000.00 Sale price Rs. 7,200.00
Sale Sold out
Condition
Language
Publication
संपूर्ण महाभारत

महाभारत - जटिल मानवी स्वभावाचे उद्बोधक चित्रण

महाभारत हे विकसित होत गेलेले 'जय' नावाच्या व्यासलिखित इतिहासाचे महाकाव्यरुप आहे. हा इतिहास वैशंपायनांनी 'भारत' रूपात जनमेजयास सांगितला आणि सौतीने 'महाभारत' स्वरूपात विकसित करून पुनर्लिखित केला. सर्वसामान्यतः मान्य असा हा क्रम आहे. या इतिहासाची महानता त्याच्या महाकाव्य रूपातच आहे. डब्ल्यू. सी. स्मिथ हा पाश्चात्य विद्वानच असे म्हणतो, 'मस्ट नॉट ए ग्रेट हिस्टरी बी ऑलवेज अॅन एपिक ?' म्हणजे, 'जो इतिहास महाकाव्यरूपात परिणत होतो तो इतिहास महानच म्हणायला पाहिजे.' मनुष्याने जीवनात सद्गुणांच्या, सद्वृत्तीच्या व सत्कर्माच्या अंतिम विजयासाठी आणि सद्धर्म प्रस्थापनेसाठी आपल्या ध्येयवादाला व्यवहारवादाचा डोळसपणा देऊन, सद्धर्माची कास न सोडता वाटचाल केली पाहिजे आणि सद्गुणांचा विजय हे साध्य मनात जपून ठेवून ते प्रस्थापित केले पाहिजे. यासाठी मार्गदर्शक म्हणूनच महर्षी कृष्णद्वैपायन व्यासांनी हा इतिहास महाकाव्य रूपात लाक्षणिक अर्थाची जाण देऊन समाजप्रबोधनासाठी जगाला सादर केला. महाभारतात काय आहे, हे विचारण्यापेक्षा, काय नाही असा प्रश्न करणे जास्त सोपे आहे. म्हणूनच 'व्यासोच्छिष्टं जगत् सर्वं' असेच सतत म्हटले गेले आहे. या ग्रंथाच्या सर्वंकष त्रिकालबाधित महत्तेबद्दल आर्यधर्मप्रसाराचे महान् कार्य करणारे स्वामी विवेकानंद म्हणतात, "महाभारत हा एक विश्वकोश आहे. प्राचीन आर्यांचे जीवन आणि व्यावहारिक तत्त्वज्ञान यांचे उद्बोधक निवेदन आहे. मानवतेने अद्यापही जिच्या साधनेसाठी तीव्र इच्छा बाळगावी आणि अविरत प्रयत्न करावेत, अशा उदात्त संस्कृतीचे प्रत्ययकारी चित्रण आहे." म्हणूनच रिष्टरसारखा मान्यवर पाश्चात्य विद्वानही म्हणतो, 'धर्माप्रमाणेच इतिहासही सर्वंकष ज्ञान आणि सामर्थ्य यांचा सुंदर व उद्बोधक समन्वय असतो.' महाभारत या अद्वितीय ग्रंथाचे महानत्व असेच आहे.
View full details