Half Price Books India
Pradkshina By Jayant Dalvi
Pradkshina By Jayant Dalvi
Regular price
Rs. 90.00
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 90.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
व्यक्तीच्या अंतर्मनाचा वेध घेणं हा दळवींच्या एकूण साहित्याचा केंद्रबिंदू. माणसाच्या आयुष्यातील आत्यंतिक दु:खाचा संबंध बहुतेक वेळा दळवींनी स्त्री-पुरुष संबंधांशी जोडलेला आहे. लैगिकता, वेड आणि वेदनेची विविध रूपं दळवी कादंबर्यांतून न्याहाळतात. दळवींच्या बर्याच कथा-कादंबर्यांतून दिसणारं विजोड संसाराचं चित्र हे त्यांच्या ऐकीव अनुभवांतून उभे राहिलेलं आहे. या संसारचित्रातील स्त्री-पुरुष संबंधाचा विशेष हा की हे संबंध सुखाचे नाहीत, सुरळीत नाहीत, कुठेतरी काहीतरी बिनसलेलं आहे. मग ते संबंध विवाहपूर्व असोत; विवाहोत्तर असोत किंवा वैधव्यदशा वा विधुरावस्थेतले असोत! दोघांपैकी एकानं पुरतं उद्धवस्त व्हावं, दुसर्यानं ते उद्धवस्त होणं सुन्न मनानं बघावं, आणि बघताबघता अखेर त्या नजरेतील ओळख हरवून जावं, असेच या अनुभवांचं स्वरूप असतं.
'प्रदक्षिणा' या दळवींच्या कादंबरीतूनही मानवी नाते-संबंधातल्या गुंतागुंतीविषयी दळवी आपले निरीक्षण मांडतात. एका नाटककाराcया आयुष्याविषयी - त्याचा कलंदरपणा आणि शेवटी त्याची झालेली शोकात्मिका याचे प्रभावी चित्रण या कादंबरीतून दळवींनी केलेलं आहे. नाटककार आणि त्याची पत्नी - त्यांच्यातील ताणतणाव, नाटककाराच्या मुलींच्या आयुष्याची झालेली परवड यांचे सुन्न करणारे दर्शन इथे घडते. आणि हे घडत असतांना अवतीभवतीचा समाज, त्यांतल्या व्यक्ती, त्यांचे अंतर्गत ताणतणाव यांबद्दलचे दळवींचे भान कधी सुटत नाही, याचा प्रत्यय त्यांच्या 'प्रदक्षिणा' या कादंबरीतून येतो.