Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

PADCHAYA by BHAGYASHREE NULKAR

PADCHAYA by BHAGYASHREE NULKAR

Regular price Rs. 199.00
Regular price Rs. 220.00 Sale price Rs. 199.00
Sale Sold out
Condition
‘सौभाग्य’ या कथेतून डॉ.सोहनी गिनीपिग प्रयोग करतात. ‘विद्या विनयेन शोभते’ मधून ‘मेकॅनिकल ट्यूटर’– कॉम्प्युटरच्या साह्याने मेंदूत ज्ञान भरण्याचा शोध लावतात. ज्ञानग्रहण करणार्‍या पेशी उत्तेजित करून मेंदूपेशीत टेपरेकॉर्डरप्रमाणे ज्ञान रेकॉर्ड होते.या भोवती हे कथानक फिरते. ‘ऐलमा पैलमा’ या कथेतून दत्तक घेतलेल्या ईशाच्या मानेला गाठ असल्याचे समजते... ही फसवणूकच असते, नीताला याचा त्रास होतो. प्रभाकर यंत्रमानव नंदिनीला घरी आणतो. ती सर्वांना शेकहॅण्ड करते. यावेळी सर्वांना ईशाची खूप आठवण येते.मग पुन्हा ईशाला दत्तक म्हणून सांभाळण्याचा निर्णय होतो. ‘एका यंत्र मानवाची डायरी’ या कथेत स्वार्थी रमेश संपत्तीसाठी मोठ्या भावाचा खून करतो,हे रोबो पाहतो व स्वत;शीच म्हणतो,‘यंत्रमानवाला नाती नाहीत ते किती बरं आहे.मानवाची निरपेक्ष सेवा करणे,हेच यंत्रमानवाचे व्रत आहे.’ ‘तो मी नव्हेच!’ या कथेतील अभिनेता- हनुमंत बाप्या कोरेगावकर ‘बहारकुमार’ नावाने फिल्मी दुनियेत प्रवेश करतो. एके दिवशी त्याची प्रामाणिक, हुशार व शास्त्रज्ञ मित्र संजयशी भेट होते. हनुमंत आजारी असतो. पण तो संजयला माझ्याऐवजी माझा क्लोन इंडस्ट्रीत पाठव,असं सांगतो. संजयला या खोट्या प्रकाराची कल्पनाच नसते. हा क्लोन ‘बहारकुमार’ म्हणून वावरतो. सर्वांनाच फसवून माणुसकीला काळिमा फासून,‘तो मी नव्हेच!’ म्हणून तो जगतो. ‘पडछाया’, ‘मृत्यू,’ ‘सत्य आणि मिथ्य’ या व इतर वैज्ञानिक कथा वाचकांना आधुनिक विज्ञानाची ज्ञानसमृद्धतेची वाट दाखविणार्‍या.
View full details