Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Muktaganche Goshta By Anil Avachat

Muktaganche Goshta By Anil Avachat

Regular price Rs. 100.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 100.00
Sale Sold out
Condition
मी लिहायला बसलोय मुक्तांगणवर. समोर तेवीस-चोवीस वर्षे पसरलेली आहेत. काय काय सांगायचे, असा प्रश्न. दुसरा, माझ्यात वाढत असलेल्या विसराळूपणाचा. कालचे आठवेना, आणि इतक्या वर्षांपूर्वीचे कसे आठवणार? पण तरी ते लिहिले तर पाहिजेच. कुणी येवढा प्रवास पाहिलेला लिहिता माणूस भेटला असता तर सोपवून मोकळा झालो असतो; पण तसाही कुणी दिसेना. बरं, ही संस्था आता लिहिण्यायोग्य नक्कीच झालीय. एक तर इतकी वर्षे ती टिकलीय. या क्षेत्रात संस्थांचा मृत्युदर अफाट असताना ती जगलीय.
पण कसं लिहिणार मी? एक प्रकारे मीच मुक्तांगणमय झालोय. मग मीच माझ्यावर लिहायचं, म्हणजे अवघडच काम. तरीही सांगतो. कारण हे अनुभव कुणाला पुढं उपयोगीही पडू शकतील. मग ती व्यसनमुक्तीची संस्था असो, की कुठली शैक्षणिक, सामाजिक संघटना असो. प्रसूतिवेदना तशाच, मुलांची आजारपणं तशीच, आणि फेटे बांधून त्यांची लग्नेही तशीच.
मुक्तांगणची सुरुवात कशी झाली हे मी मुक्तांगणच्या पेशंटशी बोलताना अनेकदा सांगितलंय. शिवाय कुठं कुठं केलेल्या भाषणातूनही. माणसाला तेच तेच सांगायचा कंटाळा येतो; पण ते सांगायला तर हवंच ना! आणि लिहिताना अधिक सविस्तर, निवांतपणे लिहिता येईल ..."
-- अनिल अवचट
View full details