Half Price Books India
Hul By Bhalchandra Nemade
Hul By Bhalchandra Nemade
Regular price
Rs. 239.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 239.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
भालचंद्र नेमाड्यांच्या कादंबर्यांमध्ये ज्या वसाहतवादी पिळवणूकीच प्रतिबिंब दाखवलं गेलेलं आहे तो केवळ ब्रिटिश साम्राज्यवादी किंवा पाश्चिमात्य औद्योगिक संस्कृतीचा वसाहतवाद नाही तर ब्राह्मणकेंद्रित धर्मशास्त्रात प्रकट झालेला भारतीय हिंदूंचा अंतर्गत वसाहतवादसुद्धा आहे, ह्या दृष्टीने पाहिले तर नेमाड्यांच्या कादंबर्यामधलं एक आशयसूत्र जोतीबा फुले, विठ्ठल रामजी शिंदे, भीमराव आंबेडकर वगैरे आधुनिक मराठी समाज चिकित्सकांशी जुळणारं आहे. त्याचबरोबर व्यक्ती आणि समाज यांच्यातलं पाश्चिमात्य व्यक्तिस्वातंत्र्यवादाच्या मुळाशी असलेलं द्वैत नाकारून भारतीय परंपरेची बहुसांस्कृतिक एकात्मता स्वीकारणारं नेमाडेंचं तत्वज्ञान धर्म आणि वर्णाचे संदर्भ नाकारून एक एकसंध सार्वजनिक जीवनाचं स्वप्न जपत राहतं ह्यातच नेमाडेंचा गूढवाद, त्यांचं अध्यात्म अधूनमधून सूत्रमय किंवा काव्यात्म रूपात प्रकट होत राहतं. 'लीळाचरित्रा'चा संदर्भ आपल्याला 'कोसला'पासून 'झूल'च्या अखेरच्या गूढ साक्षात्कारी परिच्छेदापर्यंत भेटत राहतो. महानुभावांची,
मुख्यत: खुद्द श्री चक्रधरांची सावली 'कोसला'पासून थेट नंतरच्या कादंबरी चतुष्ट्यातल्या तीन प्रकाशित कादंबर्यांवर पडलेली आहे. नेमाडेंची ही मेटॅफिझिकल वृत्ती आणि त्यानं निर्माण केलेल्या चांगदेव पाटील ह्या प्रमुख पात्राचा संसारापासून अलिप्त राहून संसाराचा सर्वव्यापीपणा कधीच नजरेआड न करणारा पारमार्थिक दृष्टिकोण ध्यानात घेणं अटळ आहे. चांगदेव पाटलानं स्थळकाळापासून केलेला सगळा प्रवास एका सांस्कृतिक अवकाशातून घडणारी जाणिवेची यात्रा आहे आणि पात्रांचे, स्थळांचे, घटनांचे सगळे अपरिहार्य तपशील जरी ऐहिक आणि जडाच्या पातळीवरले असले तरी त्यांचा आशय आध्यात्मिक आहे.
-- दिलिप पु. चित्रे, 'रुची', मार्च १९९८