Inspire Bookspace
Gatha Karnatak Printing Presschi by Sadanand Bhatkal
Gatha Karnatak Printing Presschi by Sadanand Bhatkal
Regular price
Rs. 99.00
Regular price
Rs. 110.00
Sale price
Rs. 99.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
दर्जेदार मुद्रण, मोठ्या संख्येने मराठी, इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन आणि वितरण इत्यादींमुळे ‘कर्नाटक प्रेस’, ‘कर्नाटक मुद्रणालय’ ह्या संस्था महाराष्ट्राच्या वाङ्मयीन आणि सांस्कृतिक जीवनात एक मानबिंदू ठरल्या. कर्नाटक प्रेस नाडकर्णी, कुलकर्णी आणि ढवळे अशा तीन वेगवेगळ्या कर्तबगार व्यक्तींच्या साथीने बहरत गेला आणि मुद्रण व्यावसायिकांचे आदर्शस्थान झाला. कर्नाटक प्रेसचा हा एकंदर प्रवास म्हणजे एक थक्क करणारी कहाणीच. १८८० च्या सुमारास सुरू झालेला हा प्रवास आजतागायत म्हणजे जवळजवळ सव्वाशे वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतरही मराठी भाषिकांच्या दृष्टीने एक जिव्हाळ्याचा विषय ठरला आहे. ह्या प्रदीर्घ प्रवासातील सांस्कृतिक, सामाजिक घडामोडींचे महत्त्व ओळखून प्रस्तुत संस्थेच्या रंजक कहाणीचे लेखन करावे असे हा सर्व इतिहास जवळून पाहणारे, पॉप्युलर आणि कर्नाटक प्रेस या दोघांच्या स्नेहबंधाचे एक साक्षीदार सदानंद भटकळ यांना मनापासून वाटले आणि The Karnatak Press Saga, ह्या सर्वांगसुंदर पुस्तकाची निर्मिती झाली. अनुभवसिद्ध व संशोधनात्मक शैलीतून उषा टाकळकर यांनी केलेला अनुवाद आणि सिद्धहस्त कुंचल्यातून साकारलेले बाळ ठाकूर यांचे मुखपृष्ठ यांमुळे हा सर्वांगसुंदर पुस्तकाचे महत्त्व अधिक वाढते. प्रकाशन व्यावसायिकांचे, मुद्रण व्यावसायिकांचे आदर्शस्थान असलेल्या ह्या संस्थेचा एकूणच रंजक इतिहास म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाची गाथाच वाचकांसमोर उलगडत जाते. तीन पिढ्यांची व्यवस्थापनपद्धती व कार्यशैली यांचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा प्रयत्न व्यवस्थापनशास्त्राच्या अभ्यासकांना या पुस्तकाच्या माध्यमातून करता येईल, तसेच प्रदीर्घ काळ समाज प्रबोधनाचे कार्य करणार्या ह्या संस्थेचा इतिहास सामान्य वाचकांसाठी मनोरंजक व उद्बोधक ठरेल.
