Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Dilkhulas Batchit Cricketpatunshe By Dwarkanath Sanzgiri

Dilkhulas Batchit Cricketpatunshe By Dwarkanath Sanzgiri

Regular price Rs. 69.00
Regular price Rs. 140.00 Sale price Rs. 69.00
Sale Sold out
Condition
साप्ताहिक सकाळ २१ जून २०१०
दिग्गजांशी दिलखुलास गप्पा
-- मुकुंद पोतदार
एखादी मुलाखत औपचारिक नसेल आणि त्याहीपेक्षा "दिलखुलास बातचीत' असेल, तर हे माध्यम फार प्रभावी ठरते. मुलाखतीला गप्पांचे स्वरूप असेल, तर मग ती रंगल्याशिवाय राहत नाही!
द्वारकानाथ संझगिरी यांनी अशाच गप्पांमधून भारतीय क्रिकेटमधील काही दिग्गजांचे व्यक्तिमत्त्व उलगडले आहे. या क्रिकेटपटूंनी मैदानावरील अतुलनीय कामगिरीद्वारे भारतीयच नव्हे, तर जागतिक क्रिकेटमधील "ऑल टाइम ग्रेट'मध्ये मानाचे स्थान पटकावले आहे. रमाकांत देसाई, सलीम दुराणी, टायगर पतौडी, अजित वाडेकर, एकनाथ सोलकर, करसन घावरी, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, हरभजनसिंग, वीरेंद्र सेहवाग या खेळाडूंशिवाय संझगिरी यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी चिटणीस जयवंत लेले, जॉन लिव्हरचं "व्हॅसलीन प्रकरण' हाताळलेले पंच जूडा रूबेन-माधव गोठोस्कर यांच्याशी संवाद साधला आहे.
या क्रिकेटपटूंची नावे पाहिल्यानंतर भारतीय क्रिकेटमधील साधारण १९६० पासून सुमारे पन्नास वर्षांचा कालावधी लक्षात येतो. हा काळ या क्रिकेटपटूंनी गाजविला. भारताला या कालावधीत जे यश मिळाले त्यात या मातब्बरांनी उल्लेखनीय योगदान दिले. साहजिकच या मुलाखतींमधून या क्रिकेटपटूंचे व्यक्तिमत्त्वच नव्हे तर भारतीय क्रिकेटचा इतिहासही उलगडतो. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात या क्रिकेटपटूंचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे, याचे कारण या खेळाडूंनी "सोनेरी' कामगिरी केली आहे!
अनेकदा मुलाखती घेऊन प्रसिद्ध झालेले लेखक काही वेळा हातून घडलेल्या चुकांची कबुली देत नाहीत; पण संझगिरी यांनी या संदर्भात प्रामाणिकपणे भाष्य केले आहे. खरे तर त्यांनी यावर एक प्रकरणच लिहिले आहे. "काही मुलाखती आणि माझी खंत...' अशा शेवटच्या अध्यायाद्वारे ते पुस्तकाचा समारोप करतात. अलीकडे "मीडिया'चा वापर करून आपला "अजेंडा' साध्य करणारी धूर्त मंडळी सर्वच क्षेत्रांत निर्माण झाली आहेत. अशा वेळी पत्रकारांना किती खबरदारी बाळगावी लागते, हेच संझगिरी यांनी सूचित केले आहे. भारतात तीन "सी'ची चलती आहे, असे म्हटले जाते. "सिनेमा, क्राईम अन क्रिकेट' अशा या "सी'पैकी क्रिकेटला सर्वाधिक वाचकवर्ग आहे. "स्कूप' मिळावे म्हणून "वाट्टेल ते' (होय, खरोखरच..) करणारी पत्रकार मंडळीसुद्धा असतात. पण बातमी, मुलाखत रंगविण्यासाठी एखाद्याच्या कारकिर्दीचा किंवा जीवनाचा बेरंग करून उपयोग नसतो, हे संझगिरी यांनी दाखवून दिले आहे.
संझगिरी यांनी खास त्यांच्या "स्टाइल'मध्ये या मुलाखती रंगविल्या आहेत. क्रिकेटपटूंशी असलेली जवळीक, मैत्रीपूर्ण संबंध त्यांच्यासाठी उपयुक्त ठरले, यात शंकाच नाही. पण या दीर्घ संबंधांचा फायदा घेत त्यांनी "देवपण' बहाल करण्यात आलेल्या या क्रिकेटपटूंमधील "माणूस' उलगडला आहे.
प्रत्येक क्रिकेटपटूचे व्यक्तिमत्त्व, कारकीर्द, शैली, तंत्र आणि कामगिरी वैशिष्ट्यपूर्ण आणि आगळीवेगळी असते. हे पुस्तक वाचताना हेच जाणवते. वेगवेगळ्या खेळाडूंच्या मुलाखती असल्यामुळे केव्हाही एखाद्या क्रिकेटपटूची मुलाखत वाचणेसुद्धा "इंटरेस्टिंग' ठरते. या खेळाडूंना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी मिळाली असल्यामुळे काही प्रसंगी "गौप्यस्फोट', नैराश्य, वाद-विवादही दिसून येतात. या मुलाखतींमध्ये केवळ कौतुक नसून, काही जणांनी अपयशाबद्दल अश्रूही गाळले आहेत. काही वेळा वर उल्लेख केलेल्या दिग्गजांनी चाहत्यांची अपेक्षा पूर्ण केलेली नसते; पण तसे या मुलाखतींच्या बाबतीत म्हणता येणार नाही. प्रत्येक मुलाखत रंगली असल्यामुळे पुस्तक क्रिकेटप्रेमींची निराशा करीत नाही.
View full details