Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

ANAND JANMALA by B. D. KHER

ANAND JANMALA by B. D. KHER

Regular price Rs. 125.00
Regular price Rs. 140.00 Sale price Rs. 125.00
Sale Sold out
Condition
मुकुंद आणि सुनंदाची भेट झाली ‘संततिनियमन करावे की नाही?’ या परिसंवादाच्या निमित्ताने. मग त्यांचं लग्न होतं. त्यांच्या संसारवेलीवर अरुणच्या रूपाने गोंडस फूल उमलतं. अरुणच्या जन्मानंतर मुकुंद मूल न होण्याची शस्त्रक्रिया करून घेतो; पण सुनंदाला पुन्हा दिवस गेले असल्याची चाहूल लागते आणि मुकुंदा हैराण होतो. सुनंदाच्या चारित्र्यावर शंका उत्पन्न करणारी परिस्थिती निर्माण होते. त्याचा पुण्यात बदलून आलेला मावसभाऊ गोविंदा त्याच्या अनुपस्थितीत सुनंदाशी गप्पा मारायला येत असल्याचं, त्याच्या लक्षात आलेलं असतं. गोविंदाला खरं म्हणजे सुनंदाशी लग्न करायचं असतं; परंतु मुकुंदाने तिला मागणी घातल्यावर आपला विचार बदलून गोविंदा दुसर्‍या गावी निघून गेलेला असतो. मुकुंदाने सुनंदाला मागणी घालण्यापूर्वी तिलाही तो पसंत होता, असं सुनंदाने म्हटल्याचं मुकुंदाला आठवत असतं. त्यांच्या सुखी संसारात संशयासुराने प्रवेश केलेला असतो... काय होतं पुढे? मुकुंद आणि सुनंदाच्या भावांदोलनांची कहाणी.
View full details