Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Pangalichya Aathvani By Shobha Chitare

Pangalichya Aathvani By Shobha Chitare

Regular price Rs. 149.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 149.00
Sale Sold out
Condition
जीवघेण्या विलक्षण अनुभवाचा वेध घेणारी, हृदय हेलावून सोडणारी एक प्रांजळ आत्मकथा.
म्हटलं तर हे आत्मकथन आहे. त्यातील कथानकाला विशिष्ट काळाच्या, प्रसंगांच्या मर्यादा आहेत. हे शोभा चित्रे यांच्याच जीवनातले प्रसंग जरी असले तरी ते त्यांच्याच कुटुंबापुरते सीमित आहेत. मध्यमवर्गात जन्मलेली लेखिका अमेरिकेतल्या जीवनाचा स्वीकार करून जगत असताना, बदलत्या काळाबरोबर विविध अनुभवांना तोंड देत असताना बदलली नाही ती फक्त एकच गोष्ट. ती म्हणजे मनावरचे मध्यमवर्गीय संस्कार. लग्नानंतरच्या आयुष्यात निर्माण झालेले नवे भावबंध, नातीगोती, मनावरचे मध्यमवर्गीय संस्कार जोपासताना परदेशातील आयुष्यात वाट्याला आलेली अटळ धडपड ही त्यांची वौयक्तिक जरी असली तरी ती वाचकाला प्रातिनिधिक वाटेल. पण त्याही पलीकडे, जीवनातल्या एका विशिष्ट अनुभवावर लिहिता-लिहिता त्यांचं भावविश्व इतकं विस्तारलं जातं की, तो सीमित अनुभव जणू सर्वस्पर्शी बनतो आणि वाचकाला अंतर्मुख करून टाकतो. "पानगळीच्या आठवणी'' ही प्रत्येकाने आवर्जून वाचावी, अशी भावनाप्रधान साहित्यकृती. जीवघेण्या विलक्षण अनुभवाचा वेध घेत सांगितली जाणारी ही प्रांजळ कथा हृदय हेलावून सोडते, हे नि:संशय.
View full details