Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Mati Bhanamati By Dr Narendra dhabholkar

Mati Bhanamati By Dr Narendra dhabholkar

Regular price Rs. 119.00
Regular price Rs. 125.00 Sale price Rs. 119.00
Sale Sold out
Condition
भानामती हा प्रकार जेव्हा कुणासाठी त्रासदायक, जीवघेणा ठरतो, वा या प्रकारामुळे एखाद्या व्यक्तीला त्याच्या जगण्याचा हक्क नाकारला जातो; तेव्हा अजूनही समाजात प्रबोधनाची गरज आहे, हेच सिद्ध होतं असं प्रबोधन करणारं पुस्तक.
आदिम अवस्थेतील माणूस स्वत:चे जीवन कसेबसे पुढे ढकलत होता. ढग का गडगडतात? धुवॉंधार पाऊस का कोसळतो? वीज चमकते कशी आणि अदृश्य होते ती कुठे? जंगलेच्या जंगले बेचिराख करणारा वणवा कसा निर्माण होतो? समुद्रात उसळणार्‍या लाटा, वादळ, वावटळ, भूकंप, हिमवृष्टी या सर्व बाबी त्या आदिम माणसाच्या आकलनाच्या पलीकडे होत्या. स्वाभाविकच त्याला असे वाटत होते की, हे सगळे घडवून आणणारी एक अदृश्य अलौकिक शक्ती कुठेतरी असली पाहिजे. त्या शक्तीच्या सामर्थ्यांने या असंख्य घटना घडत असल्या पाहिजेत. या शक्तीला आदिम मानवाने जवळजवळ सर्व ठिकाणी 'यातू' असे नाव दिले. स्वत:च्या जीवनाबाबत कर्तुम अकर्तुम सामथ्र्य असणार्‍या या शक्तीची पूजा बांधणे, हे ओघाने आलेच. ही पूजा बांधण्याची जी कर्मकांडे होती त्याला 'यातुक्रिया' असे संबोधले गेले. यातुशक्तीची उपासना यातुक्रियेद्वारे करणे यातून जो सिद्ध होतो त्याला 'यातुधर्म' असे नाव मिळाले. यातू या शब्दाच्या अपभ्रंशातून जादू हा शब्द तयार झाला. थोडक्यात, ही यातुविद्या म्हणजेच आजची 'ब्लॅक मॅजिक' अथवा 'जादूटोणा' अथवा 'भानामती'.
View full details