Half Price Books India
Yugant by Sanjay Raut
Yugant by Sanjay Raut
Regular price
Rs. 169.00
Regular price
Rs. 195.00
Sale price
Rs. 169.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
ही वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वाहिलेली आदरांजली आहे. कोट्यावधी मनांवर अनेक दशकं अधिराज्य गाजवणाऱ्या या महानेत्याचं व्यक्तिमत्त्व आणि झंझावाती जीवन यांचा वेध घेणारं हे पुस्तक आहे. दै. सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार श्री. संजय राऊत यांचा आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडणारा हा लेखसंग्रह आहे. शिवसेना प्रमुखांचे नेतृत्व व व्यक्तिमत्त्व अथांग आहे. प्रत्येक सच्चा मराठी माणूस शौर्य, कर्तृत्व, त्याग, सेवा, व्यासंगी, चारित्र्य, देशभक्ती, धर्मशक्ती, निर्भयता याचे स्फूर्तिस्थान म्हणून बाळासाहेबांच्याच तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे कृतज्ञतेने स्मरण करेल. या पुस्तकाच्या पानापानांतून बाळासाहेबांच्या ओजस्वी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते.
