Inspire Bookspace
Vivek Ani Vidroh by Aruna Dhere
Vivek Ani Vidroh by Aruna Dhere
Couldn't load pickup availability
विद्रोहाची शक्ती योग्य ठिकाणी आणि योग्य प्रमाणातच वापरली गेली पाहिजे याचे भान राखणारा आणि विध्वंसाबरोबरच विधायक नवनिर्माणाचा आग्रह धरणारा विवेकी परिवर्तनवादी कोणत्याही काळात दुर्मिळच असतो. तो नेहमी हे जाणून असतो की श्रद्धा डोळस हवी, त्याग सबळ हवा आणि तत्त्वे पोषक हवीत. त्याला हे माहीत असते की परिवर्तनासाठी उभारलेल्या संस्था किंवा चळवळी महत्त्वाच्या, हे खरे; पण प्रसंगी त्यांनाही मागे ठेवून, ज्याच्यासाठी परिवर्तनाचे प्रयत्न आहेत, तो माणूस अधिक महत्त्वाचा मानला जायला हवा. जीवनातले उदात्त, न्याय्य आणि निर्माणक असे जे जे आहे ते ते सांभाळण्यासाठी प्रसंगी जीवनसमर्पणाचीही तयारी ठेवायला हवी. पूर्ण समर्पण म्हणजे नुसते आततायी, प्रक्षोभक कृत्य नसावे. त्यामागे विवेक हवा. ज्यासाठी जीवन समर्पित करायचे त्याची प्रतिष्ठा राखणारी आस्था हवीच, पण जीवनाविषयीही तशी आस्था हवी. असे समर्पण कधी व्यर्थ जात नाही. ते नेहमीच समाजधारक अशी शुभंकर प्रेरणा बनते. गेल्या दोन शतकांमधल्या सुधारणावादाच्या इतिहासाने हे सत्य वारंवार उजळले आहे.
