Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Vata Ani Mukkam By Aasha Bage

Vata Ani Mukkam By Aasha Bage

Regular price Rs. 129.00
Regular price Rs. 140.00 Sale price Rs. 129.00
Sale Sold out
Condition
सहलेखक : आशा बगे, भारत सासणे, सानिया आणि मिलिंद बोकील
हे पुस्तक लेखकाच्या साहित्यनिमिर्तीविषयी आणि स्वरूपाविषयी सांगणारे असले तरी त्याचे स्वरूप मात्र मुलाखतीचे नाही. २००५ साली कथेसंबंधी झालेल्या एका कार्यशाळेच्या निमित्ताने आशा बगे, भारत सासणे, सानिया आणि मिलिंद बोकील हे चार साहित्यिक एकत्र आले होते. या कार्यशाळेच्या निमित्ताने या चौघांच्याही मनात साहित्याविषयी प्रश्न निर्माण झाले. त्यांनी त्यांना महत्त्वाचे वाटलेले काही प्रश्न स्वतंत्रपणे लिहून काढले आणि नंतर सर्वसंमतीने एक प्रश्नावली तयार केली. त्याचे 'साहित्याची निमिर्ती' 'साहित्य आणि जीवन', 'साहित्यिक आणि समाज', 'साहित्य आणि स्वातंत्र्य', 'वाङ्मयीन संस्कृती', 'साहित्य: आशय आणि रूप' आणि 'साहित्याचा प्रवास' असे विषयानुरूप भाग पाडले. वाङ्मयीन वाटचाल करताना, प्रत्येक लेखकाचा पिंड, आंतरिक व बाह्य प्रेरणा, धारणा, आकलन अनुभवविश्व, समाजाशी असलेली बांधिलकी, विचार, सांस्कृतिक पर्यावरण, अन्य बाह्य घटक यांचा विचार करता, प्रत्येकाची "वाट"चाल ही देश-काल-परिस्थितीनुरूप थोड्याफार फरकाने वेगळी असली तरी 'मुक्कामा'चे ठिकाण एकच आहे. या पुस्तकातील प्रश्नांच्या आधारे या चारही लेखकांनी दिलेली उत्तरे ही सैद्धांतिक स्वरूपाची आहेत. त्याचप्रमाणे थेट निमिर्ती प्रकिया, जेणेकरून सुस्पष्ट होईल, अशा प्रकारचे प्रश्न व त्याची उत्तरे फार थोडी आहेत.
View full details