Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Vartan Parivartan By Anjali Pendse

Vartan Parivartan By Anjali Pendse

Regular price Rs. 129.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 129.00
Sale Sold out
Condition
लोकमत ३० नोव्हेंबर २००८
आपण इतरांशी कसं वागतो यावरच आपलं व्यक्तिमत्त्व कसं हे ठरत असतं. काहीवेळा आपलं व्यक्तिमत्त्व इतरांना हवंहवंसं, तर काहीना फारच त्रासदायक वाटतं. आपलं वर्तन हाच त्यांचा मुख्य आधार असतो. आपण इतरांना हवंहवंसं वाटणं ही खरंच आनंदाची गाष्ट, पण त्यासाठी आपल्या वर्तनात नित्य बदल घडवावे लागतात. वर्षानुवर्षांच्या आपल्या सवयी, आपलं वर्तन बदलणं अनेकांना अवघड वाटत असलं, तरी शास्त्रीय पद्धतीनं वर्तनात सकारात्मक सुधारणा करता येते. आपल्या वागण्याकडे सहजगतीनं पाहणं, त्याच्या परिणामांचा डोळस आढावा घेणं, इतरांचा प्रतिसाद तपासणं, नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाणं ... अशा कृतीच्या मालिकेतून स्वत:ला बदलणं शक्य आहे. हा बदल कसा घडवायचा हेच शास्त्रीय आणि अतिशय सोप्या पद्धतीनं अंजली पेंडसे यांनी आपल्या 'वर्तन - परिवर्तन' या पुस्तकात सुरेख रीतीनं मांडलं आहे. यातील काही लेख पूर्वी 'लोकमत'मध्ये प्रसिद्ध झालेले आहेत.
आपण आपल्या शारारिक कृतीनं जसं 'व्यक्त' होतो तसंच आपल्या भावभावनांनीही. आपलं व्यक्त होणं अहिताचं, नुकसानकारक किंवा त्रासदायक असेल तर ते योग्य, उपयुक्त, आनंददायी, प्रगतिशील कसं करायचं याचे साधे, सापे, सहज अमलात आणता येतील असे मंत्र लेखिकेनं दिले आहेत. या मंत्रांनी आपल्याला स्वत:चा आणि इतरांचाही स्वभाव सहज बदलता यईल.
View full details