Urja Sayam by Dileep Kulkarni
Urja Sayam by Dileep Kulkarni
Regular price
Rs. 126.00
Regular price
Rs. 140.00
Sale price
Rs. 126.00
Unit price
per
माणसानं निसर्गात बदल घडवण्याची प्रक्रिया सहस्त्रावधी वर्षं सुरू असली; तरी जोवर हाताशी असणा-या ऊर्जा आणि तंत्रज्ञान ह्यांचं प्रमाण कमी होतं, तोवर ह्या बदलाचं प्रमाणही कमी होतं. परंतु, गेल्या तीनशे वर्षांत तंत्रक्रांती आणि ऊर्जाक्रांती ह्यांतून ‘विकासा’चं एक नवं प्रतिमान उदयाला आलं. उत्पादन वाढलं-उपभोग वाढले. कष्ट कमी होऊन जीवन सुखी झालं. पण दुर्दैवानं ही ‘सुखं’ त्यांच्याहून अधिक ‘दु:खं’च निर्माण करताहेत! अतिरेकी ऊर्जा-वापरामुळे आतून माणूस आणि बाहेरून निसर्ग मोडून पडतो आहे. संसाधनं कमी होताहेत, प्रदूषण वाढतंय, एंट्रॉपी वाढतीये. ह्यावर उपाय एकच: ऊर्जेचा हा अतिरेक टाळणं! ‘भांडवली ऊर्जां’चा वापर टाळून ‘आय ऊर्जां’च्या आधारे संयमितपणे जगायला लागणं. प्रचलित ‘विनाश-प्रतिमाना’ची चिकित्सा आणि चिरफाड करणारा आणि नव्या प्रतिमानातली विकासनीती आणि जीवनशैली ह्यांविषयी मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ