Half Price Books India
Ujavya Sondechya Bahulya (उजव्या सोंडेच्या बाहुल्या) by Pravin Bandekar
Ujavya Sondechya Bahulya (उजव्या सोंडेच्या बाहुल्या) by Pravin Bandekar
Couldn't load pickup availability
ही प्रवीण दशरथ बांदेकर यांची चाळेगत नंतरची दुसरी कादंबरी. या कादंबरीत बांदेकर अधिक सूक्ष्म आणि अमूर्त पातळीवरील प्रक्रियांमध्ये उतरतात. या प्रक्रिया मानवी अस्मितेच्या जडणघडणीशी आणि तिच्याशी जोडलेल्या विविध समस्यांशी निगडीत आहेत. हेच या कांदंबरीचे केंद्रवर्ती आशयसूत्र आहे. ही कादंबरी म्हणजे प्रचलित संवेदनशीलतेमध्ये अप्रस्तुत होत गेलेल्या आधुनिकतेच्या प्रकल्पावरचे, मूल्यव्यवस्थेच्या विराट अध:पतनावरचे अस्वस्थ करणारे भाष्य आहे. या भाष्याचे वेगवेगळे स्तर, त्यांच्यामध्ये होणारी गुंतागुंत, तिच्यात अडकलेली मानवी आयुष्ये हे सारे बाहुल्यांच्या खेळाच्या पारंपारिक संकल्पनेला विलक्षण सर्जनशील करत लेखकाने मूर्त केले आहे.
