Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Tottochaan By Kuroyanagi Tetsuko

Tottochaan By Kuroyanagi Tetsuko

Regular price Rs. 59.00
Regular price Rs. 75.00 Sale price Rs. 59.00
Sale Sold out
Condition
तोत्तोचान (स्वतः लेखिका) ही एक चंचल, शाळेतून काढून टाकलेली, खोडसाळ (?) शिक्षकांसाठी पण तरीही कुतूहलपूर्ण, उत्तम सामाजिक जाण असलेली प्रेमळ, आनंदी, धडपडी आणि निरागस चिमुरडी आहे. तिचं लहानपणीचं भावविश्‍व, तिचे पालक, लाडकी "तोमोई' शाळा आणि तिचे अनोखे मुख्याध्यापक कोबायाशी, त्यांचे शिक्षणविषयक नावीन्यपूर्ण उपक्रम, तळमळ, मुलांवरचा अतीव विश्‍वास...हे सारं आणि अजून खूप काही सांगणारं "तोत्तोचान.' (मूळ लेखिका : तेत्सुको कुरोयानागी, अनुवाद : चेतना गोसावी) कोबायाशींच्या मते, सगळी मुलं स्वभावतः चांगलीच असतात. तो चांगुलपणा रुजवणं आणि मुलांची वैयक्तिकता टिकवणं महत्त्वाचं असतं. स्वाभाविक व नैसर्गिक वाढीसाठी मुलांना शिक्षणाबरोबरच क्रीडा, संगीत निसर्ग, चित्रकला यांच्या जोडीला मुलांवर अथांग प्रेम करणारे पालक व शिक्षक मिळणं फार गरजेचं आहे. शाळांचा अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकमुक्त असावा, शिक्षण हसत-खेळत चालावं, असं त्यांना वाटे. तोमोई शाळेतले अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम, खेळ, गमती आपल्या शिक्षणपद्धतीत कदाचित अति आदर्शवादी वाटतील; पण तरीही शिक्षणासंबंधी प्रेम, आस्था असणाऱ्या प्रत्येकाने वाचलंच पाहिजे,असं हे पुस्तक
View full details