Skip to product information
1 of 1

Half Price Books India

To Aani Tee By John Grey

To Aani Tee By John Grey

Regular price Rs. 119.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 119.00
Sale Sold out
Condition
अनुवादक : डॉ. रमा मराठे
प्रेमात पडणं हा जीवनातला एक चमत्कार असतो. एकमेकांच्या प्रेमात पडलेल्यांची दुनियाच बदललेली असते. सारं काही चिरंतन-दैवी वाटू लागतं. प्रतिदिन लाखो लोक अशा उदात्त चिरंतन प्रेमाच्या शोधात असतात. आपण अगदी एकमेकांसाठीच आहोत असं सुरूवातीला त्यांना वाटतं. पण नंतर मैफिल उधळली जाते. प्रेम कुठेतरी हरवतंच. संबंध दुरावतात. पतीपत्नी दुरावतात. एकमेकांबद्दल वाटणार्‍या प्रेमापेक्षा उपकाराची भावना, आर्थिक गरज. संस्कार, समाजाची भीती, मुलाबाळांची चिंता अशा अनेक इतर कारणांनीच हे पती-पत्नी कसेबसे टिकून असतात. या सर्वावर उपाय काय? तर प्रत्येक स्त्रीनं आणि पुरूषानं एकमेकांच्या वैशिष्ट्य भेदांचा जाणीवपूर्वक स्वीकार केला की हृदयस्थप्रेम बहरतं. जोडीदाराची आपल्यापेक्षा वेगळी अशी वैशिष्ट्य समजून घेण्यामुळंच आपण हवं ते मिळवण्यात यशस्वी होऊ शकतो. या पुस्तकात स्त्री आणि पुरूष यांच्यातील भेद व वैशिष्ट्ये यांची तपशीलवार चर्चा केली आहे. याचाच अर्थ हे नातं कोणत्याही तो आणि ती मधील असू शकतं. आणि ते कसं जपावं, त्यातून प्रेम-आनंद, सुख-समाधान,सहकार्य आणखी बरंच काही - हे सर्व कसं मिळवावं, तसेच वादविवाद, भांडणं, गैरसमज, दुरावा, असहकार्य, तिरस्कार हे सगळं कसं टाळावं. हे या पुस्तकात साध्या सोप्या भाषेत सांगितले आहे. जीवनातील हरवलेला आनंद मिळवून देणारं, प्रत्येकानं एकदा तरी वाचलंच पाहिजे असं आत्मविकासाच्या वाटेवर चालविणारं पुस्तक.
View full details