Inspire Bookspace
Tatparya by Dilip Dhongde
Tatparya by Dilip Dhongde
Couldn't load pickup availability
‘तात्पर्य’ या शीर्षकाखाली जीवनाचे सारतत्त्व सांगणारी काही स्फुट चिंतने या ग्रंथात संगृहित करण्यात आली आहेत. या टिपणांच्या माध्यमातून डॉ. दिलीप धोंडगे यांनी ‘चिंतनिका’ या वैशिष्ट्यपूर्ण लेखनप्रकाराचे पुनरुज्जीवन केले आहे. ‘नीतिविमर्श’ हा या लेखनाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. माणसे शहाणी व्हावीत, त्यांच्यातला द्वेषमत्सर दूर व्हावा आणि अवघे जीवन मंगलमय व्हावे या जीवनेच्छेतून हे लेखन झालेले आहे.समकालीन जीवनातल्या मूल्यर्हासातून मार्ग काढण्यासाठी, पर्यायी विचारधारा सुचविण्याची क्षमता असलेले हे लेखन आहे.
दार्शनिक चिंतनाची डूब असलेले हे लेखन यथार्थदीपिकेसारखे सतत मूळ विचारांवर प्रकाश टाकत राहते. मराठी लोकोक्ती, सुभाषिते, म्हणी,वाक्प्रचार, संतवचने, नीतिकथा यांची पेरणी करीत आपल्या प्रतिपाद्य विषयाची मांडणी करणे, ही डॉ. दिलीप धोंडगे यांची लेखनशैली आहे.त्यामुळे या लेखनाला खास मराठीचा असा सांस्कृतिक घाट प्राप्त झाला आहे.
- डॉ. रमेश नारायण वरखेडे
