Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Sushil Kumar Shinde by Subhas Chandran

Sushil Kumar Shinde by Subhas Chandran

Regular price Rs. 179.00
Regular price Rs. 190.00 Sale price Rs. 179.00
Sale Sold out
Condition
नियतीविरुद्ध इच्छाशक्ती, परिस्थितीविरुद्ध जिद्द यांच्यात श्रेष्ठ कोण या प्रश्र्नावर वर्षांनुवर्षं चर्चा सुरू आहे. याच संघर्षातून जिद्दीने मार्ग काढत तेजस्वीपणे घडलेल्या व्यक्तिमत्त्वाचं- सुशीलकुमार शिंदे यांचं हे चरित्र! कर्तृत्व, आत्मविश्र्वास आणि सकारात्मक दृष्टी या बळावर ढोर गल्लीतल्या एका मुलानं लोकसभेतील नेतेपदापर्यंत केलेल्या प्रवासाची ही कहाणी! चित्रपटाच्या कल्पित कथेपेक्षाही थरारक अशी सत्यकथा! पोरके बालपण, अर्धवट सुटलेली शाळा, हरकाम्या, न्यायालयात शिपाई, पोलीस दलातील काम अशी केलेली वेगवेगळी कामे आणि परिस्थितीची प्रतिकूलता या सगळ्यांतून त्यांनी त्यांची यशोगाथा कशी लिहिली, विचार, शब्द आणि कृती यांचा निश्र्चयाने मेळ कसा घातला याची ही कथा! कष्ट केले तर माणसाला स्वाभिमानानं जगता येतं, ही जिद्द मनात ठेवून आयुष्यातील काळोखावर मात करणाऱ्या सुशीलकुमार शिंदे यांची ही कथा हरलेल्यांमध्येही जिंकण्याची जिद्द निर्माण करेल. सुशीलकुमार शिंदे यांचा ध्येयप्रवास हा मार्गदर्शक आहे. बदलत्या परिस्थितीला सामोरे जाऊन तिला आपल्या बाजूने वळवत, महत्त्वाच्या टप्प्यांवर अचूक निर्णय घेणारा हा प्रवास, महत्त्वाकांक्षेने स्वप्नांना वास्तवात उतरवणारा हा प्रवास ही प्रत्येकाकरिता स्फूर्तिगाथा आहे.
View full details