Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Stree Likhit Marathi Kadambari (1950-2010 ) by Aruna Dhere

Stree Likhit Marathi Kadambari (1950-2010 ) by Aruna Dhere

Regular price Rs. 288.00
Regular price Rs. 320.00 Sale price Rs. 288.00
Sale Sold out
Condition
Publication
Languge

स्वातंत्र्योत्तर साठ वर्षांच्या कालखंडात लक्षणीय स्वरूपाचे कादंबरीलेखन करणार्‍या अकरा लेखिकांच्या वाङ्‌मयकृतींविषयीचे, अकरा अभ्यासक स्त्रियांनी लिहिलेले लेख या पुस्तकात समाविष्ट आहेत. कमल देसाई यांच्यापासून कविता महाजन यांच्यापर्यंतच्या तीन पिढ्यांच्या स्त्री-कादंबरीकार इथे विचारार्थ निवडल्या आहेत.

या लेखिकांच्या लेखनामागे जीवनशोधाचे गंभीर प्रयोजन आहे. लेखन ही यांच्या आंतरविकासाशी संबंधित गोष्ट आहे. वर्तमान लेखिका आता प्रयोग करण्याची, लिंगभावातीत लेखन करण्याची आणि स्वत:ला निरभ्रपणे अनुसरण्याची मोकळीक सहजपणे घेताना दिसतात. सामाजिक संकेत झुगारण्याची, लिंगविशिष्ट अनुभवांना थेटपणे आणि धीटपणे सामोरे जाण्याची किंवा प्रसंगी भडक भाषा वापरण्याचीही गरज वाटली तर त्या तिचा नि:संकोच आदर करतात.

स्त्रीजीवन, कुटुंबजीवन आणि स्त्री-पुरुषसंबंध हेच बहुतांशी केंद्रवर्ती विषय असतानाही या कादंबरीकार स्त्रिया पुरुषविरोधाचा कडवटपणा दूर ठेवून आपल्या अनुभवविश्‍वाच्या सूक्ष्म गुंतागुंतीचा शोध निष्ठेने घेताना दिसतात. या शोधामागची त्यांची शहाणीव त्यांच्या लेखनाला वेगळी उंची देणारी आहे.

View full details