Inspire Bookspace
Shri Narasimhopasana : Uday ani Vikas by R C Dhere
Shri Narasimhopasana : Uday ani Vikas by R C Dhere
Regular price
Rs. 559.00
Regular price
Rs. 600.00
Sale price
Rs. 559.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
भारतीय दैवतमंडळात प्रल्हादवरद नरसिंह हा एक प्रभावशाली देव आहे. दुर्जनांचा संहारक आणि सज्जनांचा प्रतिपालक अशी त्याची लोकमनातली प्रतिमा आहे.
अर्धपशू आणि अर्धमानव असा हा उग्र देव भक्तांच्या भावविश्वात पुुरुषसिंहांना प्रेरक ठरणारा देव मानला जातो.
ह्या दैवताच्या मूर्ती विविध प्रकारच्या आहेत आणि त्या केवळ भारतातच नव्हे तर नेपाळ आणि कंबोडियापर्यंत आढळून आल्या आहेत.
एकीकडून हा देव आदिम जमातींशी आणि वन्य जमातींशी नाते सांगणारा आणि यक्षकुळाशीही नाते सांगणारा, तर दुसरीकडून प्रख्यात राजकुळांशी संबंधित झालेला!
नरसिंहाचा असा एक सांस्कृतिक प्रवासह्या ग्रंथातून उलगडला आहे.
नरसिंह दैवताच्या मिथकाची उत्क्रांती, त्याच्यासंबंधी रचली गेलेली विविध पुुराणे, माहात्म्ये, स्तोत्रे आणि अन्य उपासना -साहित्य, संस्कृत आणि मराठी साहित्यातील नरसिंह दर्शन आणि भारतभरातील नरसिंहक्षेत्रांचा मागोवा घेताना नरसिंह दैवताचा विविधांगी उलगडा ह्या ग्रंथात झाला आहे.
सामाजिक-सांस्कृतिक इतिहासाचेच नवे आकलन करून देणारा हा ग्रंथ संग्राह्य आहे.
