Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Shikharavaroon By Edmund Hillary

Shikharavaroon By Edmund Hillary

Regular price Rs. 119.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 119.00
Sale Sold out
Condition
अनुवाद - श्रीकांत लागू
सर्वप्रथम 'एव्हरेस्ट' सर करणारे सर एडमंड हिलरी यांचे - एव्हरेस्ट आणि त्यांच्या इतर साहस मोहिमांचे तपशीलवार आणि चित्तथरारक अनुभव-कथन करणारे - आत्मचरित्र.

ई-सकाळ रविवार १९ मार्च २००६
चित्तथरारक आयुष्याच्या शिखरावर
(दीनदयाळ वैद्य)

शाआरYय व भय यात अगदी नाजूक रेषा असते. एव्हरेस्टसारख्या सर्वोच्च शिखरावर तर ती खूपच लहरी होत असावी. शाआरYय म्हणजे जगणे आणि भय म्हणजे मृत्यू हा एरवीचा अर्थही उलथापालथा करण्याची या शिखराची ताकद. त्यावर पहिल्यांदा पाऊल ठेवणारे सर एडमंड हिलरी (व तेनसिंग शेर्पा) यांना त्याचा जेवढा अनुभव तेवढा कोणाला असणार? सर हिलरी यांची आत्मकथा श्रीकांत लागू यांनी मराठीत आणली आहे. 'शिखरावरून' असे तिचे शीर्षक असले, तरी ती फक्त एव्हरेस्टपुरती मर्यादित नाही. खास बर्फासाठी तयार करण्यात आलेल्या ट्रॅक्टरने दक्षिण ध्रुवावर स्वारी, उत्तर ध्रुवावरची मोहीम, जेट बोटीनं बंगालच्या उपसागरातून गंगेच्या उगमापर्यंतचा प्रवास हे हिलरी यांच्या नावावरील विक्रमांचे वर्णनही त्यात आहे. त्यातील सर्वाधिक रोमहर्षक मोहिमेचा 'क्लायमॅक्स' काही तासांवर असताना या कथनाला सुरवात होते आणि नंतर हिलरीचे बालपण, तारुण्यातील मोहिमा, मुलगा पीटर याची एव्हरेस्टस्वारी अशी वळणे घेत ते शेवटाला येते. अनुवादक श्रीकांत लागू यांना गिर्यारोहणाचा अनुभव आहे. सुरेंद्र चव्हाण यांच्या एव्हरेस्टस्वारीत त्यांना पाठबळ देणार्‍या संघात लागू यांची महत्त्वाची भूमिका होती. खास हिमालयातील मोहिमांत वापरण्यात येणार्‍या पारिभाषिक शब्दांना लागू यांनी मराठी पर्याय दिले आहेत. मराठी व्यक्तीचेच आत्मचरित्र वाटावे इतका सहजपणे त्यांनी हा अनुवाद केला आहे.

ध्रुवावरच्या मोहिमा, न्यूझिलंडचे भारतातील राजदूतपद, नेपाळमधील शेर्पांसाठीचे कार्य याविषयी मूळ आत्मचरित्रात हिलरींनी सविस्तर लिहिले आहे. एव्हरेस्टवर पहिले पाऊल कोणाचे, एव्हरेस्टनंतर अतिउंचीवरील मोहिमांसाठी शरीराने साथ न देणे, दक्षिण ध्रुवावर सर्वप्रथम पोचण्यासाठी इतर सहकार्‍यांवर केलेली मात अशा गोष्टींविषयीही त्यांनी प्रांजळपणे लिहिले आहे.

सामान्य वाचकाला एव्हरेस्टची मोहीम समजून घेताना येणारी सगळ्यात मोठी अडचण म्हणजे शिखरांची भौगोलिक स्थाने आणि त्यांच्या दुर्गमतेचे भान असणे. ते येण्यासाठी पुस्तकात दोन नकाशे आहेत. मात्र ते पुरेसे नाहीत. शिखरांची तुलनात्मक उंची, बर्फाळ प्रदेशातील गिर्यारोहणात येणार्‍या अडचणी, त्यामुळे मानसिक संतुलन, शारीरिक ताकद आणि मदतीच्या साधनांना असलेले महत्त्व लक्षात येण्यासाठी आणखी संदर्भ गरजेचे होते. विशेषत: दक्षिण ध्रुवाच्या मोहिमेच्या वर्णनात अपरिचित भाग, नावांमुळे वाचकाचा रसभंग होण्याची वेळही अनेकदा येते. त्या वेळी लागू यांची ओघवती भाषाच वाचकाला पुढे खेचून नेते. संदर्भांची उणीव सोडली, तर 'शिखरावरून' हे पुस्तक एव्हरेस्टप्रमाणेच हिमशुभ्र आहे.
View full details