Half Price Books India
Setu By Aasha Baghe
Setu By Aasha Baghe
Regular price
Rs. 129.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 129.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
गंगेच्या मनोहारी पाण्याची, गंगेच्या तीरावर असलेल्या स्वत:च्या घराची-परिवाराची अनावर ओढ असलेला ब्रिजमोहन, अमेरिकेतले आधुनिक संपन्नच जीवन सोडून जन्मभूमीकडे परततो. इम्युनॉलॉजीसारख्या विषयात पीएच. डी. केलेली आणि आपल्या कामात उत्तम पदी मग्न झालेली ब्रिजमोहनची पत्नीइ सुचरिता निरुपयाने. उदित या लहानग्या मुलाबरोबर साथ देत भारतात येते. सुचरिताची आई एक शिक्षणसंस्था चालवणारी. वडील विचारवंत, मोठे लेखक, इतिहासाचे अभ्यासक. ब्रिजमोहनचे घर शेती करणारे. सुखवस्तूपणाने राहणारे. उभयतांच्या घरच्या भिन्नं भिन्न पार्श्वभूमीच्या विरोधाभासात आणि व्यक्ति गत भावनिक द्वंद्वात वेढल्या जाणार्या, नदीसारखी वळणे घेत जाणार्या आयुष्याची कहाणी सेतूमध्ये प्रकटत जाते. माणसामाणसांमधल्या सूक्ष्म अशा भावभावनांचा वेध प्रगल्भपणे आशा बगे इथे घेतात. मानवी जीवनातल्या गूढांचे, रहस्यांचे, अनपेक्षित अनुभवांचे मनोज्ञ दर्शन त्या सेतूमध्ये घडवतात.
