Inspire Bookspace
Sahityacha Swabhav by G M Kulkarni
Sahityacha Swabhav by G M Kulkarni
Couldn't load pickup availability
प्रा.गो.म.कुलकर्णी यांचा हा अखेरचा समीक्षा-लेखसंग्रह. गो.म. नी जी विपुल स्फुटसमीक्षा लिहिली; ती सर्वच स्फुट असली तरीही कमालीची गंभीर आणि अर्थपूर्ण आहे. वाङ्मयप्रवाहातील अडथळे दूर करण्यास मदत करणे आणि प्रश्नांचे नवे भान निर्माण करणे असे द्विविध स्वरूपाचे मौलिक कार्य गो.म.कुलकर्णी यांच्या समीक्षीने केलेले आहे. रंगनाथ पठारे, पु.शि.रेगे, अरविंद गोखले, कवी बी, वि.स.खांडेकर,रा.चिं.ढेरे इत्यादींच्या लेखनाचे महत्त्वमापन करणारे लेख या संग्रहात आहेत. तसेच भावगीत, खंडकाव्य, आत्मचरित्र यांसारख्या वाङ्मयप्रकाराबाबत नवचिंतन मांडणारे लेखही आहेत.
गो.म.कुलकर्णी यांचे सारेच समीक्षालेखन मराठी समीक्षेला मार्गदर्शन करणारे अन् सशक्त करणारे आहे. याची साक्ष हा संग्रह देतो.
