Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Rahat Gadga By C V Joshi

Rahat Gadga By C V Joshi

Regular price Rs. 25.00
Regular price Rs. 45.00 Sale price Rs. 25.00
Sale Sold out
Condition
चिं. वि. जोशी यांचा प्रारंभीचा विनोद विडंबनात्मक, कोटीप्रचुर असाच आहे. कोल्हटकरी विनोदाचे वळण यात स्पष्ट दिसते. पण हळुहळू ते उपहासाकडून परिहासाकडे वळले. त्यातूनच पुढे 'चिमणराव'चा जन्म झाला. पांढरपेशा, मध्यमवर्गीय जीवनातील दारिद्र्य, अज्ञान, निरागसपणा यांचे मोठे खुसखुशीत दर्शन चिमणरावच्या जगात घडते. मनुष्यस्वभावातील विसंगती, खोटा डौल, आत्मप्रौढी यावर यातून मोठा वेधक प्रकाश झोत टाकला आहे. प्रसंगनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ अशा दोन्ही जातींच्या विनोदाचा सुंदर संगम cइं. वि. जोशी यांच्या लेखनात अनेक ठिकाणी आढळतो.
चिमणराव, गुंड्याभाऊ, काऊ, मोरू-मैना यांच्याच जगातील खानावळवाल्या भीमाआजी असेच आपले लक्ष वेधून घेतात. वाचकाचे प्रेम आणि सहानुभूति मिळवतात. भीमाआजीचे अज्ञान, माणसे पारखण्याचे कसब, काबाडकष्टच्या आयुष्यातही टिकवून ठेवलेली मिश्किल विनोदी वृत्ती - सारे कसे चटका लावणारे.
'रहाट गाडगं' ही लघुकादंबरी म्हणजे या मिश्किल म्हातारीच्या जीवनाची तिनेच सांगितलेली कहाणी. जुन्या पिढीतले पांढरपेशे आणि त्या काळातील हतबल स्त्री व तिची सुखदु:खे सहज सांगून जाणारी ही आत्मकहाणी. वाचकाला हसवताहसवता त्याला हळूच अंतर्मुख करणारी. चिं. वि. जोशी यांच्या विनोदाचे एक वेगळेच सामर्थ्य या लेखनात ध्यानी येते.
View full details