Inspire Bookspace
Parmeshwaracha Computer By P K Kulkarni
Parmeshwaracha Computer By P K Kulkarni
Regular price
Rs. 29.00
Regular price
Rs. 30.00
Sale price
Rs. 29.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
‘परमेश्र्वराचा कॉम्प्यूटर’ हे या पुस्तकाचे शीर्षक वाचल्यानंतर या लिखाणाचा विषय ‘माणूस’ हाच असावा हा आपला तर्क बरोबर आहे. पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीत आपण वेगळे आहोत असे मनुष्याला वाटते, ते त्याच्या सर्वस्पर्शी जाणिवेमुळे. या जाणिवेमुळे माणसाला ‘शब्द’ सुचला आणि त्याची भावसृष्टी प्रचंड विस्तारली. असे वेगळेपण असले तरी प्रत्येक प्राणिमात्राची शरीराची आसक्ती हा स्थायीभाव पण त्याच्या सोबतीला आहेच. शरीर आणि जाणिव यामुळे सदैव अस्वस्थ असलेल्या माणसाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात आणि द्वंद्वे उभी राहतात. मनुष्य यातून घडला-आजही असाच घडत आहे. प्रत्येकाच्या मनात उभ्या राहणा-या अशा प्रश्नांचा आणि माणसाच्या घडण्याचा मागोवा ‘परमेश्र्वराचा कॉम्प्यूटर’ या लिखाणात घेतला आहे. लेखकाला वाटते की स्वत:च्या मनात डोकावण्याचाच हा एक अनुभव आहे. संवाद स्वरूपात मांडलेले हे लिखाण नाटक होते का – का चिंतननाट्य? काही का असेना-आपण वाचा आणि स्वत:च्या मनात डोकावण्याचा प्रत्यय आणि आनंद मिळतो का- तसेच लिखाणाचा शेवट हा माणसाच्या जाणिवेच्या मर्यादाच व्यक्त करितो का- हे सर्व आपणच ठरवा.
