Inspire Bookspace
Pachrut by Arun Jakhade
Pachrut by Arun Jakhade
Couldn't load pickup availability
अरुण जाखडे यांनी ‘पाचरुट’ या घटीतनिष्ठ कादंबरीत कृषीसंस्कतीतील उत्कट शोकांतिका अतितळमळीने व पोटतिडिकीने मांडली आहे. या कादंबरीत भेटणारा नायक व त्याच्याभोवती पात्रे, त्यांची निकटची नाती, त्यांचे राग-लोभ, हेवे-दावे, सुख-दु:खे यांचे चित्रण वेगवेगळ्या घटना-प्रसंगातून येते; त्याचबरोबर कादंबरीत प्रत्ययास येणारे मानवी मनाचे वास्तव आणि त्याचा जिवंत प्रत्यय वाचकास अंतर्मुख करणारे आहे. अतिरिक्त ऊस उत्पादनामुळे ही गोड उसाची ही कहाणी कडू होते. समकालीन ग्रामीण वास्तवाचे दाहक चित्रण या कादंबरीत चित्रीत झाले आहे. आकाशवाणी अहमदनगर केंद्रावरून या कादंबरीचे वाचन दोन वेळा प्रसारित झाले असून, कामगार कल्याण मंडळाचा अण्णाभाऊ साठे पुरस्कार व दै. सकाळचा नानासाहेब परुळेकर पुरस्कार या कादंबरीला प्राप्त झाला आहे.
