Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Niyatishi Karar By M G Tapasavi

Niyatishi Karar By M G Tapasavi

Regular price Rs. 89.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 89.00
Sale Sold out
Condition
जेष्ठ पत्रकार कै. मो. ग. तपस्वी यांनी त्रेचाळीस वर्षे दिल्लीत पत्रकारिता केली. या काळात त्यांचा संबंध जवळजवळ सर्वच पंतप्रधानांशी आला. पंतप्रधान पदावर आरूढ झालेल्या तेरा पंतप्रधानांच्या कारकीर्दीचे समतोल, नेमके व नेटके मूल्यमापन लेखकाने या पुस्तकात केले आहे.

"त्रेचाळीस वर्षे दिल्लीत पत्रकारिता केलेले सव्यसाची पत्रकार मो.ग. तपस्वी "नियतीशी करार "ह्या आपल्या पुस्तकात लिहितात,"वल्लभभाई (पटेल )यांचे नेहरूंशी बिनसण्याचे कारण वैयक्तिक मुळीच नव्हते.काश्मीरचा प्रश्न हे त्यांच्यातील वितुष्टाचे कारण होते.वल्लभभाईंनी साधार दाखवून दिले होते की काश्मीर प्रश्न नेहरू चुकीच्या मार्गाने हाताळत आहेत. काश्मीर प्रश्नावरून वल्लभभाई आणि नेहरू यांच्यात तीव्र मतभेद होताच नेहरूंनी पहिले काम कोणते केले असेल,तर त्यांनी काश्मीर प्रकरण गृहखात्याकडून म्हणजे वल्लभभाईंकडून काढून परराष्ट्रखात्याकडे सुपूर्द केले,म्हणजेच स्वत:कडे घेतले,कारण नेहरूच तेव्हा परराष्ट्रमंत्रीही होते.हैद्राबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठीवल्लभभाईंनी सैनिकी कारवाई केली ही गोष्ट नेहरूंना रुचली नव्हती. म्हणूनच त्यांनी काश्मिरात जिंकत चाललेल्या आपल्या सैन्याला युद्धविराम करण्याचा आदेश दिलाइतकेच नव्हे तर माउंटबॅटन यांच्या दडपणाखाली येऊन त्यांनी काश्मीर- समस्या (संयुक्त) राष्ट्रसंघात दाखल केली. वल्लभभाई फक्त इतकेच म्हणाले -"जवाहरलाल इस भूल पर पछताएगा और रोयेगा." नेहरूंनी केलेल्या त्या घोडचुकीचेच दुष्परिणाम आज इतक्या वर्षांत आपण भोगत आहोत. देशाची फाळणी पत्करताना नेहरूंनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी कधी हे जाणून घेण्याचा आणि सरकारी दप्तरी तसे नोंदवून ठेवण्याचा प्रयत्नच केला नाही ,की भारताच्या सरहद्दी नेमक्या कुठे आणि कशा आहेत ?त्यांना कोणत्या मापाने वा मानदंडाने मोजायचे आहे ?आजदेखील ,पाकिस्तानशी तीनदा प्रत्यक्ष युद्धे होऊनसुद्धा आमची पश्चिम सरहद्द नेमकी आखलेली नाही.कारगिल युद्धाच्या वेळी याचा विदारक प्रत्यय पुन्हा आला.कोणत्या पर्वत शिखरावरून किंवा दरीमधून आपली सरहद्द जाते,याचा नेमका नकाशा संरक्षण दलाजवळ नव्ह्तच.याचाच फायदा पाकिस्तान घेत होता." तपस्वी लिहितात.
-- रश्मी घटवाई
View full details