Inspire Bookspace
Nehrunchi Sawali by Savita Damle
Nehrunchi Sawali by Savita Damle
Regular price
Rs. 199.00
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 199.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
नेहरू जेवढे लोकप्रिय, तेवढेच माणूसवेल्हाळ. त्यांच्या स्वभावाची ही दोन लोभस वैशिष्टये त्यांच्या सुरक्षा-अधिकाऱ्यांसाठी मात्र त्रासदायक होती. सुरक्षा-यंत्रणा झुगारून देत नेहरू विराट गर्दीत घुसत. उघडया टपाच्या गाडीतून प्रवास करत. कधी गाडीच्या बॉनेटवर बसून सफरचंद खात खात जमावाशी संवाद साधत. मधेच मागच्या-पुढच्या मोटारींचा ताफा थोपवून रस्त्याकडेचा वाहता नळ बंद करायला धावत. नेहरू लहरी होते, रागीट होते, अवखळ होते, प्रेमळ होते आणि रुसकेसुध्दा होते. नेहरूंचे सुरक्षा-अधिकारी केएफ रुस्तमजी यांनी आपल्या रोजनिशीमध्ये पंडितजींची अशी अनेक रूपे टिपून ठेवली आहेत. नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखवणारी त्या रोजनिशीतील काही निवडक पाने.
