Half Price Books India
Navegavbandhche Divas By Maruti Chitampalli
Navegavbandhche Divas By Maruti Chitampalli
Regular price
Rs. 100.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 100.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
वन अधिकारी म्हणून मारुती चितमपल्ली यांनी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात अनेक महत्वाच्या पदांवर काम केले. कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या विकासात त्यांचे भरीव योगदान आहे. या कार्यकालावधीत त्यांनी वृक्षसंपदा, प्राणीजगत, पक्षीजगत यांचा खूप अभ्यास, संशोधन केले. या संशोधनाच्या आधारे त्यांनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय परिषदांत पेपर वाचले तसेच सर्वसामान्य माणसासाठी पुस्तकंही लिहिली. नवेगाव राष्ट्रीय उद्यान भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेला असून १९७५ साली त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला. याच उद्यानातील ११ चौरस कि.मी. क्षेत्र लाभलेला बांध म्हणजे या उद्यानाचं वैशिष्टय. सुमारे ५०० वर्षांपूर्वी कोलू पाटील यांनी हे ऐतिहासिक तळं बांधलं आणि जिल्ह्यातील सर्वात मोठं तळं म्हणून नवेगावबांधची ख्याती आहेच त्याचबरोबर हा परिसर म्हणजे पाखरांचा स्वर्गच. अशा नवेगावबांध येथे चितमपल्लींना १२ वर्ष वास्तव्य करण्याची संधी मिळाली. या काळात त्यांनी नवेगावबांधाच्या विकासाच्या अनेक योजना कार्यान्वित केल्या. पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली किंवा धर्मकुमार सिंहजी यांनीही या विकासकामांची दखल घेत समाधानाची पोचपावतीही दिली.
