Inspire Bookspace
Mungi : Ek Adbhut Vishwa by Pradeepkumar Mane
Mungi : Ek Adbhut Vishwa by Pradeepkumar Mane
Couldn't load pickup availability
पृथ्वीवर अस्तित्वात असणार्या सगळ्या सामाजिक जीवात सर्वांत अधिक अद्भुत अन् कार्यक्षम असणारी मुंगी आपल्या अवती-भोवती आपण पाहात असतो. ह्या मुंग्यांचा अभ्यास मात्र आपण नेमकेपणाने केलेला नसतो. ह्या पुस्तकात मुंग्यांची जीवनप्रणाली व जीवनवैशिष्ट्ये विविध प्रकारे सांगितली आहेत. त्यावरून हा छोटा जीव किती अर्थपूर्ण व अभ्यासासाठी
आव्हानात्मक आहे हे लक्षात येते. आजच्या नव्या तंत्रज्ञान व व्यवस्थापन युगात मुंगीकडून आपण अनेक क्रांतिकारक गोष्टी शिकून घेत आहोत. संदेशवहन, वाहतूक व्यवस्थापन याप्रमाणेच ‘ऍन्ट अल्गोरिदम’ या प्रणालीचा संगणकीय कार्यपद्धतीतही उपयोग केला जात आहे. रोबोटिक्स,इंटरनेट, बँकिंग या क्षेत्रातही मुंगी तांत्रिक आणि व्यवस्थापनातील धडे शिकवीत आहे. जीवशास्त्र, तंत्रज्ञान, व्यवस्थापन आणि तत्त्वज्ञान ह्या क्षेत्राला मुंगीच्या अभ्यासातून विलक्षण साहाय्य होत आहे. ह्या व अशा आणखी काही गोष्टींचा ऊहापोह प्रस्तुत पुस्तकात केला आहे.
