Half Price Books India
Morpankhi Sawalya By Ranjeet Desai
Morpankhi Sawalya By Ranjeet Desai
Regular price
Rs. 29.00
Regular price
Rs. 60.00
Sale price
Rs. 29.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
रणजित देसाई हे एक बहुआयामी साहित्यिक आहेत. कादंबरी-लेखनामुळं त्यांनी दिगंत कीर्ती मिळवली असली, तरी त्यांनी साहित्यिक कर्तृत्वाचा आरंभ कथालेखनानंच केला होता.
सुरुवातीच्या काळात त्यांनी कथांच्या माध्यमातून ग्रामीण वास्तवाचा वेध घेतला. त्यानंतर इतिहासाच्या गर्भरेशमी, अद्भुत, सुंदर वातावरणात नेणार्या मनोवेधक कथाही त्यांनी लिहिल्या. संगीत-क्षेत्रात अलौकिक यश संपादन करणार्या काही कलावंतांची सुखदु:खंही त्यांनी आस्थेवाईकपणे चितारली. पुढच्या काळात त्यांनी अत्यंत प्रवाही शैलीत काही निसर्गकथाही लिहिल्या, काही नक्षत्रकथा लिहिल्या, काही रूपककथाही लिहिल्या.
'मोरपंखी सावल्या' या त्यांच्या आगळ्यावेगळ्या संग्रहात निसर्गाच्या सावलीत वाढणार्या प्राण्यांच्या पंधरा कथा साक्षेपानं एकत्रित केलेल्या आहेत. या सर्व कथांचं विलक्षण वैशिष्ट्य असं, की त्या पूर्णत: मानवविरहित आहेत.
कथासूत्रात बांधलेली ही ललित्यपूर्ण निसर्गचित्रं पाहून आणि अनुभवून, रणजित देसाई हा आपल्या काळातील केवढा थोर साहित्यिक आहे, याचा उत्कट प्रत्यय वाचकांना येईल.