Half Price Books India
Ma Mati Manush by Mamata Banerjee
Ma Mati Manush by Mamata Banerjee
Regular price
Rs. 249.00
Regular price
Rs. 255.00
Sale price
Rs. 249.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
ममता बॅनर्जी हे नाव तत्त्वनिष्ठ राजकारणाशी पूर्णपणे जोडले गेले आहे. पश्र्चिम बंगालच्या धगधगत्या राजकीय वातावरणात स्वतःच्या चारित्र्यसंपन्न विचारसरणीने स्वतःचं वैशिष्ट्यपूर्ण स्थान त्यांनी निर्माण केले. ‘करा किंवा मरा’चा नारा देत त्यांनी समाजाला एक दिशा दाखवली. मॉं... माटी... मानुष म्हणजेच माता, मातृभूमी आणि सामान्य नागरिक यांच्या हितासाठी, त्यांच्या सन्मानासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण आयुष्य त्यांनी पणाला लावले. वैयक्तिक पातळीवर त्यांनी केलेल्या त्याग आणि संघर्ष यामुळे त्या लक्षावधी लोकांच्या ‘दीदी’ बनल्या. त्यांचे सारे जीवन संघर्षमय घटनांनी भरलं आहे. प्रेरणादायी इतिहास आणि सांस्कृतिकदृष्ट्या श्रीमंत असणाऱ्या पश्र्चिम बंगालने मधल्या काळात राजकीयदृष्ट्या झापडबंद विचारसरणीमुळे सातत्याने दहशतवाद, हिंसा, पिळवणूक, जुलूम व क्रौर्य यांचा अनुभव घेतला. या चित्रातून समाजाला बाहेर काढण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी अविरत परिश्रम केले. त्यांनी 26 दिवस केलेले उपोषण कोणताही बंगाली नागरिक विसरू शकणार नाही.
