Inspire Bookspace
Lashkaratil Sevasandhi by Major Dr. Sham Kharat
Lashkaratil Sevasandhi by Major Dr. Sham Kharat
Regular price
Rs. 229.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 229.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
अनेक राष्ट्रप्रेमी युवकांना संरक्षण विभागात नोकरी करण्याची इच्छा असते. सैन्यदलात अधिकारी होणे ही अभिमानाची व आदराची गोष्ट आहे. ह्यासाठी ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ संस्थेत अनेक विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असतात. त्यासाठी त्यांना काही मार्गदर्शन मिळावे व त्यांचा हेतू सफल व्हावा हा ह्या पुस्तकाचा उद्देश आहे. प्रस्तुत पुस्तकामध्ये संरक्षण क्षेत्रातील भूदल, नौदल, वायुदल, निमलष्करी दल ह्यांबद्दल माहिती दिलेली असून लष्करी सेवेत अधिकारी होण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता व पात्रताप्राप्तीचे मार्ग, विविध प्रशिक्षण संस्था, निवडप्रक्रिया,एसएसबीची मुलाखत, अधिकार्यांच्या रँक्स व बढती, त्यांना मिळणारे फायदे ह्यांबाबत सविस्तर माहिती दिली आहे. लष्करातील अधिकारी वर्गाबरोबरच सैनिकदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. चारही दलातील सैनिक होण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक, शारीरिक व तांत्रिक पात्रता, निवडप्रक्रिया, भरतीची केंद्रे, भरती प्रक्रिया, त्यांच्या रँक्स व बढती, सैनिकांना मिळणारे ङ्गायदे ह्यांबद्दल माहिती दिली आहे. शालेय स्तरापासूनच मुलांना लष्करातील अधिकारी होण्यासाठीची पूर्वतयारी करता यावी ह्यासाठी स्थापन केलेल्या विविध शैक्षणिक संस्था, लष्करी अधिकारी व जवानांबरोबरच मुलकी कर्मचारीदेखील महत्त्वाचे आहेत. ह्या सर्व गोष्टींची माहिती एकत्रित स्वरूपात येथे उपलब्ध करून दिली आहे. रोजगाराबरोबरच देशसेवा करण्याची मनोमन इच्छा आहे अशा सर्व युवकांना व त्यांच्या पालकांना हे पुस्तक उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल ह्यात शंका नाही.
