Inspire Bookspace
Laplela London लपलेलं लंडन By Arvind Ray
Laplela London लपलेलं लंडन By Arvind Ray
Couldn't load pickup availability
या पुस्तकात लंडननिवासी लेखक अरविंद रे लंडनचा एक वेगळाच, लपलेला कोपरा आपल्याला दाखवतात. इथं आहेत भारत, पाकिस्तान, पोलंड, ग्रीस, इस्टोनिया, इटली, बल्गेरिया, आफ्रिका अशा देशांतून लंडनमध्ये स्थलांतरित झालेली माणसं. मुकुंद दीक्षित या समंजस, सहृदयी इंग्रजी शिक्षकाच्या वर्गात ती माणसं दाखल होतात आणि आपल्यासमोर लंडन जीवनशैलीचे एकेक अनोखे पदर उलगडू लागतात. रक्तात भिनलेले स्वत:च्या मातीतले संस्कार विसरू शकतात का ही माणसं? ‘वेळ आणि पैसा' ही ब्रिटिश संस्कृती कितपत आत्मसात करू शकतात ही माणसं? लंडनमध्ये स्थायिक होण्यासाठी राबराब राबणं.... पासपोर्ट्स जाळणं.... कागदी लग्न जुळवणं.... काय काय वाटा पळवाटा शोधतात ही माणसं ! लंडनमधील खाजगी इंग्रजी शाळा, त्यांचे लबाड संस्थाचालक ! शेअरींग हाऊसमध्ये दाटीवाटीनं राहणारे टेनंट्स, त्यांच्या व्यथा आणि कथा ! अरिंवद रे ही सारी पात्रं, प्रसंग इतक्या चित्रमय, संवेदनशील, खेळकर शैलीत मांडतात की, हे पुस्तक उघडल्यावर पूर्ण केल्याशिवाय मिटणं अशक्य ! अ-निवासी भारतीयाची आपल्याला अंतर्मुख करणारी कहाणी.
