Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Kishorana Samjun Ghetana by Nalini Jugare

Kishorana Samjun Ghetana by Nalini Jugare

Regular price Rs. 189.00
Regular price Rs. 210.00 Sale price Rs. 189.00
Sale Sold out
Condition
Publication
Languge
इयत्ता पाचवी ते दहावी ह्या शालेय गटातील मुला-मुलींचे वय व त्यांच्या वाढीचा हा टप्पा महत्त्वाचा आहे. प्रत्येक मुला-मुलीच्या आयुष्यातील ही वर्षे फार महत्त्वाची असतात. ह्या वयातील मुलं-मुली फारशी मोठी नसतात आणि लहानही, मधलीच एक गोंधळलेली अवस्था असते. आजूबाजूचं वातावरण व वयामुळे ह्या मुलांत होणारे शारीरिक बदल, मानसिक आंदोलने वेगवेगळी असतात. अशा नाजूक काळात प्रत्येक मूल समजून घेऊन त्याच्याशी वागणं ही अवघड कला ठरते. ह्या पार्श्वभूमीवर मुला-मुलींच्या पौगंडावस्थेतील समस्या ह्या महत्त्वाच्या विषयावर नलिनी जुगारे ह्यांनी अभ्यास केला. ह्या समस्यांमुळे निर्माण होणारी कोंडी त्यांनी आपल्या निरीक्षणातून, संशोधनातून व अभ्यासातून स्पष्ट व मुक्त केली आहे. काही मार्गदर्शन केले आहे व आदर्श शिक्षिकेप्रमाणेच समुपदेशकाची भूमिकाही घेतली आहे. प्रयोगशील अध्यापिका असलेल्या नलिनी जुगारे यांचे हे पुस्तक पालकांना व शिक्षकांना मार्गदर्शक ठरेल. आपल्या निरागस व निष्पाप मुलांचे व विद्यार्थ्यांचे भावी आयुष्य सुवर्णमय व्हावे ह्या उदात्त हेतूने त्यांनी हे पुस्तक साकारले आहे.
View full details