Half Price Books India
Kayamche Prashn by Ratnakar Matkari
Kayamche Prashn by Ratnakar Matkari
Regular price
Rs. 239.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 239.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
ज्या समाजात आपण वाढतो-वावरतो, त्या समाजाचे प्रश्न आपलेच आहेत, असं मानणारे लेखक किती असतात? अर्थातच कमी. समाजासाठी जागल्याची आणि मार्गदर्शकाची भूमिका निभावणार्या अशा मोजक्या लेखकांपैकी महत्त्वाचं एक नाव म्हणजे रत्नाकर मतकरी. लोकशाहीच्या गुन्हेगारीकरणापासून श्रद्धेच्या बाजारीकरणापर्यंत, समाजाच्या सांस्कृतिक फुटकळीकरणापासून शासनाच्या निगरगट्टीकरणापर्यंत, साहित्यिकांच्या बोटचेपेपणापासून साहित्यिक व्यासपीठावरील असांस्कृतिक उठबशीपर्यंत अनेक ज्वलंत प्रश्नांवर मतकरी स्वतःची भूमिका परखडपणे मांडत आले आहेत. जीवनाविषयीची समग्र समज आणि मनात रुजलेली खोल न्यायबुद्धी या वैशिष्ट्यांमुळे त्यांच्या भूमिकांना महत्त्व आहे. अशा निर्भीड लेखकाने विविध सामाजिक, राजकीय अन् सांस्कृतिक मुद्द्यांवर कधी दैनिकांमध्ये लेख लिहून, तर कधी भाषणांमधून केलेल्या सडेतोड भाष्याचा दस्तावेज म्हणजे हे पुस्तक. लेखकाचा सार्वजनिक वावर कसा असायला हवा याचा वस्तुपाठ घालून देणारं.
