Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Kay Tujhya Manat By Mangala Godbole

Kay Tujhya Manat By Mangala Godbole

Regular price Rs. 49.00
Regular price Rs. 85.00 Sale price Rs. 49.00
Sale Sold out
Condition
Publication
Language
स्त्री-पुरुष समानतेचे कितीही नारे दिले, तरी प्रत्यक्षात सहजीवन नेमके कसे असते? जगण्यात आधुनिकता येऊनही या सहजीवनाचे कोडे उलगडलेले नाही. त्यातही स्त्री जीवनाचे अनेक तरंग जाणवून जातात. आधुनिक स्त्रीच्या भावजीवनाचा शास्त्रशुद्ध मागोवा घेणारे 'काय तुझ्या मनात?' हे मंगला गोडबोलेंचं पुस्तक आहे.
संपूर्ण पुस्तक 'स्त्री- केंद्री' आहे. मात्र 'स्त्री- जन्मा ही तुझी कहाणी' अशी रडकथा त्यात नाही. नवथर तरुणी, नववधू, गर्भवती, माता, प्रौढा, अनेक प्रकारचे एकटेपण, म्हातारपण अशा स्त्री जीवनाच्या बदलत्या भूमिका इथे जाणण्याचा प्रयत्न होतो. आपल्याकडे महिलांची मानसिकता, सामाजिक स्थान यांविषयीचे भान तसे एकूणच कमी आहे. एखादीला 'काय तुझ्या मनात?' विचारुन लगेच उत्तरे मिळत नाहीत. ती काढावी, तर्काने जुळवावी लागतात. मन व शरीरविज्ञानाची जोड देऊन, नाना संदर्भ घेऊन ही उत्तरे शोधावी लागतात. नेमके हेच सारे यात आहे.
View full details