Inspire Bookspace
Kavitechya Savalya by Daya Mitragotri
Kavitechya Savalya by Daya Mitragotri
Regular price
Rs. 109.00
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 109.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
या कविता आहेत पाण्याच्या, पावसाच्या
पावसात भिजण्याच्या, भिजून खोलवर ओलावण्याच्या
या कविता आहेत
पापणी भरून अश्रूंच्या
मनतळाशी हलणार्या मुक्या मुक्या दु:खाच्या
अश्रूंमधून वाहणार्या नि:शब्द वेदनेच्या
स्वप्नं आहेत ही काही
काही ओंजळीत आलेले
निसटते अलवार क्षण आहेत रंगीत, थरथरणारे
काही आहेत हळवे, मृदू आठवणींचे पिसारे
या कविता आहेत शब्दांमध्ये उतरलेल्या
आणि शब्दांपलीकडे साकळलेल्या
हृदयस्थ भावनांच्या, मौनात विरघळू पाहणार्या
कळणार्या... बर्याचशा न कळणार्या
