Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Jyotish Vidyecha Shreeganesha (ज्योतिष विद्येचा श्रीगणेशा) by B S Kulkarni

Jyotish Vidyecha Shreeganesha (ज्योतिष विद्येचा श्रीगणेशा) by B S Kulkarni

Regular price Rs. 100.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 100.00
Sale Sold out
Condition
Publisher
बी. एस. कुलकर्णी

अगदी प्राचीन काळात माणसाला आपल्या भावी काळाची प्रथमच जी स्वप्ने पडली असतील, स्फूर्ती अथवा संचार घडला असेल तसेच नवनवीन तत्त्वांचा शोध लावण्याचा विचार स्फुरला असेल तिथे ज्योतिषशास्त्राचा उगम आहे.

शास्त्रातील मानसशास्त्राशी याचे जवळचे नाते आहे. तसेच सामाजिक शास्त्राच्या कुटुंबातीलच हे शास्त्र असल्यामुळे गणिताहून याचे वेगळेपण लक्षात येते. कारणाचा शोध घेऊन तत्त्वाचा बोध घेणे हा या शास्त्राचा उद्देश नाही.

मानवी मनाचा थांग लावणे, त्याच्या कार्यशक्तीचा, सुप्त गुणांचा, कुशाग्र बुद्धिकौशल्याचा किंबहुना अंतर्मनाच्या मूल्यमापनाचा हा प्रयत्न आहे. मनाचा शोध घेण्याची ही धडपड अनादि आहे. तो नानाविध पद्धतीने होत आला आहे.

त्या अनेक मार्गांपैकी ज्योतिषशास्त्र हे एक निश्चितच शास्त्र आहे. तसा दृष्टीकोण ठेवून या शास्त्राचा अभ्यासपूर्वक उपयोग केला गेला तर मानवी जीवनाच्या प्रगतीला साहाय्य होईल. इतकेच नव्हे; तर समाजाच्या कल्याणासाठी सुमदायाला देखील हे शास्त्र उपयुक्त ठरेल.
View full details