Inspire Bookspace
Jugad by Ramchandra Pathare
Jugad by Ramchandra Pathare
Couldn't load pickup availability
जुगाड म्हणजे जुळणी
बांधकाम विश्वातला तो एक परवलीचा शब्द.
जुगाड सरकारी आनंदीआनंदाचं!
जुगाड माणसांचं! चमत्कारिक प्रवृत्तींचं!
परागंदा झालेल्या पावसाचं!
होरपळणार्या गावांचं; रोजगार हमीच्या साथीचं!
लाचारपणे मस्का मारणार्यांचं!
साहेबांच्या पुढं-पुढं करणार्यांचं!
नवे शब्द, नवी भाषा, नव्या परिमाणांचं!
बोगस मस्टचं! चोरीच्या सिमेंट-रेनफोर्समेंटचं! डांबराचं!
बाई बाटलीच्या सौद्याचं! सोईस्कर अफरातफरीच्या साटेलोट्याचं!
खिरापतींच्या कुरणात चरण्यासाठी सोकावलेल्या खादीधारी गिधाडांची अफलातून फिल्डिंग म्हणजे जुगाड. स्थापत्य विश्वाचा छोटेखानी आलेख किंवा मुक्तपणे फ्लॅश केलेल्या निवडक प्रकाशचित्रांचा कोलाज म्हणजे जुगाड.
