Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Jayawant Dalvi n Vishayi by Mangala Athlekar

Jayawant Dalvi n Vishayi by Mangala Athlekar

Regular price Rs. 162.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 162.00
Sale Sold out
Publication
Language
Author
दळवी म्हणत, “माणसाच्या भागधेयात सोळा-सतराच्या वयात जे घडतं, ते त्याला जन्मभर पुरतं आणि तेच त्याचा जन्मभर पिच्छाही पुरवतं.” मग दळवींचं भागधेय काय होतं? त्या वयात त्यांनी काय पाहिलं, काय अनुभवलं, की, ज्यानं आयुष्यभर त्यांचा पिच्छा पुरवला? जे सतत त्यांच्या साहित्यात डोकावत राहिलं? आरवली ते अमेरिका या प्रचंड भटकंतीत दळवींची अधिक ओळख झाली ती माणसाच्या दु:खाशीच! त्यांनी दुस-या-च्या दु:खाचा पाठपुरावा केला, पण स्वत:च्या दु:खाची कुठे वाच्यता केली नाही. आयुष्यभर दळवींनी आपल्या वागण्यानं इतरांच्या मनात कुतूहल निर्माण केलं, आणि मरणानंतरही ते तसंच जागं ठेवलं. दळवी खरे कसे होते? हा आहे त्यांना जाणून घेण्याचा एक प्रयत्न. त्यांच्या पूर्वायुष्यातील काही घटनांमधून. साहित्यात प्रतिबिंबित झालेल्या त्यांच्या व्यक्तिगत अनुभवांतून. त्यांच्या पत्रव्यवहारातून. मित्रमंडळी आणि नातेवाईकांशी झालेल्या संभाषणांतून. आणि खुद्द दळवींशी झालेल्या गप्पागोष्टींमधून. या प्रयत्नाचं नाव आहे. 
View full details