Inspire Bookspace
Janmajanjal by Rajan Khan
Janmajanjal by Rajan Khan
Couldn't load pickup availability
आपला जन्म का होतो, हे माणसाला कळालं असतं, तर बरं झालं असतं. मिळालेल्या जन्माचं नेमकं काय करायचं आणि तो कसा जगायचा-अनुभवायचा हे माणसाच्या हातात असतं तर आणखी बरं झालं असतं. खरं दुखणं तेच आहे-माणसाचा जन्म- जगणं माणसाच्या अखत्यारीत नाही. जगणारा प्रत्येक माणूस खरं तर याच एका व्यथेनं सर्वाधिक पीडलेला आहे. या व्यथेचाच वसा प्रत्येक माणसात असतो आणि त्या व्यथेवर थेट ताबा मिळवून तिची तंदुरुस्ती करण हेही माणसाच्या हातात नसतं त्यामुळं पीडा अधिकच. म्हणून मग माणूस आपल्या पीडेची कारणं आणि उपाय इतर माणसात शोध पाहतो. ती सापडतात की नाही या चक्रात सापडतो. सापडतात-सापडत नाहीत असा खेळ त्याच्या आयुष्यात होत राहतो. त्याचचं एक जंजाळ त्याच्या भोवती होऊन बसतं आणि मिळालेला जन्म जगायच त्याचं राहूनच जातं.
आपण काय जगलो, या प्रश्नाचं उत्तर कोणत्याही माणसाला गवसत नाही; जगणं म्हणजे काय तेही मग कुठल्याच इसमाला कळत नाही.
