Inspire Bookspace
Jagu Anande... Ekmekansathi by Anildas
Jagu Anande... Ekmekansathi by Anildas
Regular price
Rs. 54.00
Regular price
Rs. 60.00
Sale price
Rs. 54.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
तू मला आवडलास म्हणून...मी माझा हात तुझ्यापुढे केला आहे
स्नेहाचे सुंदर क्षण अनुभवताना मी...तुला जाणून घेण्याचा प्रयत्नही केला आहे
तुझ्या मनाची आणि शरीराची भाषा- एखादी कविता ऐकावी
तशी मी ऐकली आहे सारीच कडवी मला आवडली आहेत
असे नव्हे;
पण आवडलेली काही कडवी मला विश्वास देणारी आहेत
माझ्यामधलेही तुला काही आवडले आहे
हे मी जाणून आहे कुणी कुणाला पूर्ण जाणू शकत नाही
हे जसे मी जाणते तसे ते तू ही जाणत असशील
आणि उमजूनही असशील की...तसे असणे...ही
आपणा दोघांमधील वेगवेगळेपणाची मानवी अपरिहार्यता आहे
नव्या, सहजीवनाच्या, प्रारंभासाठी मला एवढे पुरे आहे.
