Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Hasagat By Dilip Prabhavalkar

Hasagat By Dilip Prabhavalkar

Regular price Rs. 69.00
Regular price Rs. 160.00 Sale price Rs. 69.00
Sale Sold out
Condition
Publication
Language
मराठी रंगभूमीवरील एक बहुरूपी व अभिजात अभिनेता म्हणून दिलीप प्रभावळकर यांनी मोठा लौकिक मिळवलेला आहे. ही वाटचाल चालू असतानाच प्रभावळकर यांनी 'मोहिनी'तून आपल्या विनोदी लेखनाची पावले टाकायला सुरुवात केलेली होती. गेल्या सुमारे वीस वर्षांत त्यांनी लिहिलेल्या तेरा निवडक विनोदी कथांचा हा संग्रह.
प्रभावळकर यांचा विनोद बुद्धीग्राह्य नसून हृदयग्राह्य आहे. त्यामुळे साहजिकच हा विनोद बंधनातीत आहे; आणि म्हणूनच त्याचा संचार व आकर्षणही व्यापक आहे. अतिशय निरागस व प्रसन्न शैलीतून हा विनोद फुलतो. अभिनयाप्रमाणेच प्रभावळकर यांच्या लेखनालाही एक सुखद सहजता प्राप्त झाली आहे. धबधब्यासारखा कोसळणारा हा विनोद नाही; तर पाणफुले शिंपीत झुळझुळणार्‍या कारंज्यासारखी त्याची जातकुळी आहे. भाबड्या, निरागस व्यक्तिरेखा आणि प्रसंगनिष्ठ विनोद यांच्या सांगडीतून प्रभावळकरांनी या कथांची खुमासदार निर्मिती केली आहे. हे कथालेखन करतांना त्यांना नाट्यकलेतील आजवरचा उदंड अनुभव उपयुक्त ठरल्याचे जाणवते.
प्रभावळकर यांनी ह्या विनोदी कथा लिहितांना कथाघाटातील विविधतेकडेही लक्ष पुरवले आहे. त्यामुळे या कथा एकसाची झालेल्या नाहीत. या दृष्टीने 'हसगत'मधील 'छंद किशाचा', 'हॅलो... हॅलो... ', 'वामन शिवराम' या कथा विशेष लक्षवेधक ठरतात.
मराठी विनोदी कथेची आजची बिकट दशा पाहता, प्रभावळकरांची ही चमकदार 'हसगत' वाचकाला थोडा नवा दिलासा देऊन जाईल असा विश्वास वाटतो.
View full details