Inspire Bookspace
Gopal Ganesh Agarkar : Vyakti ani Vichar by V. S. Khandekar
Gopal Ganesh Agarkar : Vyakti ani Vichar by V. S. Khandekar
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
आगरकरांच्या विशुद्ध, उदात्त आणि प्रेरक व्याक्तत्वाचे किती तरी लहान-मोठे आकर्षक पैलू दाखविता येतील. विद्यार्थी, शिक्षक, लेखक, संपादक अणि समाजसुधारक यांपैकी कोणत्याही दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले, तरी ते आदर्शच वाटतात. त्यांचे हे सर्व वैयाqक्तक गुण त्यांच्या लेखनात आणि शिकवणीत उत्कटत्वाने प्रतिबिंबित झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या निबंधांत विशाल दृष्टी, सत्यप्रीती, जिव्हाळा, आवेश आणि तळमळ यांचा अपूर्व संगम झालेला आढळतो. मराठी भाषेला भूषणभूत झालेल्या निबंधकारांत त्यांचे स्थान अत्यंत उच्च आहे. पण साहित्यकार म्हणून त्यांनी मिळविलेले पहिल्या प्रतीचे यश हे काही कलेचे यश नाही; ते विचारशक्तीचे यश आहे. ते समाजाविषयी त्यांना वाटणाNया अलौकिक आपुलकीचे यश आहे. आपल्या भोवतालचे जग सुखी व्हावे, म्हणून प्रामाणिकपणाने तळमळणाNया एका महान आत्म्याचे ते यश आहे. निबंधाचे तंत्र काय असते विंâवा काय असावे, याचा आगरकरांनी फारसा अभ्यास विंâवा विचार केला नसावा; पण सर्व प्रकारच्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या स्वत:च्या समाजाच्या अधोगतीच्या कारणाचा मात्र त्यांनी कसून, अगदी मूलगामी पद्धतीने वर्षानुवर्षं विचार केला. या विलक्षण विचारप्रक्षोभातच त्यांच्या हृदयंगम निबंधलेखनाचा उगम आहे. आगरकरांनी लोकजागृतीच्या एकमेव हेतूने आपले सारे निबंधलेखन केले असले तरी, त्यांच्या अनेक स्वाभाविक वाङ्मयगुणांचा विलासही त्यांच्या ठिकाणी आढळतो. लेखणी हे त्यांच्या दृष्टीने खड्ग होते, कुंचला नव्हता; पण त्यांच्या या खड्गाची मूठ रत्नजडित होती. या कुंचल्याच्या मोहक, पण कृत्रिम रंगांना ज्यांची सर कधीच येणार नाही, असे विलक्षण पाणी त्या खड्गाच्या तळपत्या धारेतून चमकत होते.’
